पुण्यात हायप्रोफाइल सेक्स / पुण्यात हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, भारतीय तरुणीसह उज्बेकिस्तानच्या तरुणीची सुटका

Mar 06,2019 05:53:00 PM IST

पुणे- पुणे पोलिसांनी विमाननगर भागात हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा भंडाफोड करून दोन तरुणींची सुटका केली अाहे. त्यात उज्बेकिस्तानच्या एका तरुणीचा समावेश आहे. पोलिसांनी विशाल निर्मल (26) आणि कृष्ण प्रकाश नायर (23) या दोन दलालांना अटक केली आहे.

पुण्यातील एका हॉटेलमध्ये विदेशी तरुणीला देहविक्री करण्यास जबरदस्ती केली जात असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला.

पोलिसांनी दोन्ही तरुणींची रेस्क्यू होममध्ये रवानगी केली आहे. त्यात एक भारतीय तर दुसरी उज्बेकिस्तान येथील आहे.

पोलिसांनी आरोपी दलाल विशाल निर्मल आणि कृष्ण नायर या दोघांना अटक केली आहे. तसेच तीन अारोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी आरोपींकडून पाच हजार रुपये रोख आणि मोबाइल फोन जप्त केले आहेत.

X