Home | Maharashtra | North Maharashtra | Jalgaon | High school girl suicide due to non-receipt of notes

अभ्यासाला नोट्स न मिळाल्याने उच्चशिक्षित तरुणीची आत्महत्या

प्रतिनिधी | Update - May 22, 2019, 10:19 AM IST

जळगाव जिल्ह्यातील बोदवडची घटना

  • High school girl suicide due to non-receipt of notes

    जळगाव - अभ्यासासाठी वेळेत नोट्स न मिळाल्यामुळे एका उच्चशिक्षित तरुणीने रॅट किल (उंदीर मारण्याचे औषध) खाऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी घडली. या घटनेमुळे तिच्या कुटुंबीयांना जबर धक्का बसला. शुभांगी सीताराम सोनवणे (वय २५, रा. साळशिंगी, ता. बोदवड) असे मृत तरुणीचे नाव आहे. दरम्यान, तरुणीने रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी आपण या कारणामुळे औषध खाल्ल्याचे कुटुंबीयांना सांगितले.


    शुभांगी ही साळशिंगी गावात एका शाळेत कंत्राटी पद्धतीने इंग्रजी शिकवण्याचे काम करीत होती. तसेच एमएचे (इंग्रजी) शिक्षणही घेत होती. वडिलांचे निधन झालेले असल्यामुळे एक बहीण व आई यांची जबाबदारी तिच्या खांद्यावर होती. अशात अभ्यासासाठी तिला वेळेत नोट्स न मिळाल्याने तिने १८ मे रोजी घरात उंदीर मारण्याचे औषध खाल्ले होते. यानंतर तिची प्रकृती खराब झाल्यामुळे कुटुंबीयांनी तिला जळगावातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी तिचा मृत्यू झाला.

Trending