आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नादरम्यान झोपडीत घुसला भरधाव ट्रक, जेवण करणाऱ्या वऱ्हाडींना चिरडले; लहान मुलीसह 8 जणांचा मृत्यू, 5 गंभीर जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पटना - बिहारच्या लखीसराय जिल्ह्यातील हसली येथे बुधवारी रात्री लग्नाच्या आनंदाचे शोकात रुपांतर झाले. भरधाव ट्रकने रस्त्याच्याकडेला असलेल्या झोपडीतील अनेक लोकांना चिरडले. या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला. तर पाच जण गंभीर जखमी झाले. अपघात घडताच ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. 


झोपडीत जेवण करत होते लोक
हलसी येथील दुखी मांझी यांच्या मुलीचे लग्न होते. बुधवारी रात्री वरात आली. वधू आणि वर पक्षाकडील लोक रस्त्याकडेला असलेल्या या झोपडीत जेवण करत होते. तेवढ्यात एक भरधाव ट्रक वीजेचा खांब तोडत थेट झोपडीत घुसला. 


सात जणांचा जागेवरच मृत्यू 
झोपडीत लग्नाच्या जेवणाचा आनंद घेणाऱ्या 7 जणांचा जागेवरच मृत्यू झाला. मुस्कान या चिमुकलीने रुग्णालयात नेताना प्राण सोडले. गंभीररित्या जमखी झालेल्यांना लखीसराय येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर काही लोकांवर हलसी पीएचसी येथे उपचार सुरु आहेत. मृतांमध्ये तीन वर तर पाच वधू पक्षातील लोकांचा समावेश आहे.  


मृतांच्या नातेवाईकांना 20-20 हजार रुपयांची नुकसान भरपाई
या दुर्घटनेमुळे क्रोधीत झालेल्या लोकांनी लखीसराय सिकंदरा रोडवर चक्का जाम केला होता. एसडीओ मुरली प्रसादने सांगितले की, ट्रक ताब्यात घेतला असून रजिस्ट्रेशन नंबरच्या आधारे ट्रक मालक आणि चालकाची ओळख करण्यात येत आहे. मृतांच्या नातेवाईकांना 20-20 हजार रुपयांचे चेक देण्यात आले. यानंतर लोकांनी मार्ग मोकळा केला.