Home | Khabrein Jara Hat Ke | high-tech jail in Sweden

हायटेक जेल : भिंतींना काचा, उष्णतेपासून बचावासाठी छतावर केले वृक्षाराेपण, कैद्यांच्या खाेल्याही पाण्याची बचत हाेईल अशा तयार केल्या

वृत्तसंस्था | Update - Apr 12, 2019, 11:17 AM IST

स्वीडनच्या कारागृहात फ्रिजद्वारे केली जाते ऊर्जेची बचत

  • high-tech jail in Sweden

    स्टॉकहोम - स्वीडनमधील एक कारागृह बंदिगृहाच्या संकल्पनेला छेद देते. कारण या कारागृहाच्या छतावर १,१०० चाैरसमीटरमध्ये चक्क हिरवळ करून वृक्षाराेपण करण्यात आले आहे. यासह चारही बाजूंना ६,००० चाैरसमीटर भिंतींना उष्णताराेधक काचा लावण्यात आल्या असून, यामुळे या वास्तूत कायम गार वातावरण असते. तसेच ८ प्रकारच्या टाकाऊ पदार्थांसाठी एक डिस्पाेझल रूमही बनवण्यात आली आहे. या सर्व साेई-सुविधांमुळे या कारागृहास (ब्रियम पब्लिक प्रोजेक्ट्स इन यूज-२०१९)हा इको-फ्रेंडली पुरस्कार देऊन गाैरवण्यात आले आहे.


    स्वीडनमधील तेबलन-४ नावाची एक इमारत २०१० मध्ये स्वीडिश कंपनीने खरेदी केली हाेती. त्यानंतर या इमारतीचे रूपांतर कारागृहात करण्यात आले. ‘स्वीडिश जेल व प्रोबेशन सर्व्हिस’ (क्रिमिनल वाॅर्डन) असे या इमारतीचे नाव आहे. पुरस्कार देणाऱ्या संस्थेचे अध्यक्ष अॅलन येट‌्स यांनी सांगितले की, या कारागृहात सुरक्षेपेक्षा स्वच्छतेला जास्त महत्त्व दिले गेले आहे व परीक्षकांना ही बाब खूप आवडली. वासेच्या प्रॉपर्टी हेड सारा जागर्मो यांच्या मते छतावर केलेल्या वृक्षाराेपणामुळे इमारतीवर रेडिएशन व तीव्र उष्णतेचा परिणाम हाेत नाही. परिणामी, जमिनीत पाण्याचा स्तर कायम राहताे व राेपांमध्ये परागण हाेत राहते. याशिवाय कारागृहातील कैद्यांच्या खाेल्याही पाण्याची बचत हाेईल यादृष्टीने बांधण्यात आल्या आहेत व येथील फ्रीजमधूनही ऊर्जा वाचवण्याचा प्रयत्न केला जाताे. येथे एलईडी लायटिंग लावली असून, एका मेकॅनिकल व्हेंटिलेशन सिस्टिमद्वारे इमारतीस थंड ठेवले जाते. त्यामुळे इमारतीचे तापमान सुमारे ५० ते ६० % कमी हाेते. किचनमधील कचऱ्यापासून बायोगॅस बनवला जाताे. तसेच येथील भाेजन १२ % सेंद्रिय भाजीपाल्यापासून बनवले जाते. यासह कैद्यांना आठवड्यातून दाेन दिवस शाकाहारी जेवण दिले जाते, असेही त्यांनी सांगितले.

Trending