आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Highest Earning Ticket Checker, Rs. 1.5 Crore Collected From 22,000 Non ticket Passengers In One Year

सर्वात जास्त कमाई करणारा तिकीट चेकर, एका वर्षात 22 हजार विना तिकीट प्रवाशांकडून वसुल केले दिड कोटी रुपये

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ट्रॅव्हलींग तिकीट इंस्पेक्टर लांब प्रवासाच्या ट्रेन आणि लोकल ट्रेनमधून विना तिकीट प्रवाशांकडून दंड वसुल करतात

नवी दिल्ली- रेल्वे विभागातील एका तिकीट चेकरने 22 हजारांपेक्षा ज्यास्त विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवांशांकडू तब्बल दिड कोटी रुपये वसुल केले आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, ट्रॅव्हलींग तिकीट इंस्पेक्टर एसबी गलांडे व्यक्तिगतरित्या सर्वात जास्त रेव्हेन्यू कमवणारे कर्मचारी बनले आहेत. सेंट्रल रेल्वे (सीआर) फ्लाइंग स्क्वाडमध्ये ते पदस्त आहेत, मागील वर्षी त्यांनी हे वसुली केली आहे.


रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, इतर तीन तिकीट चेकर्सनी 2019 मध्ये प्रत्येकी एक कोटी रुपयांची दंड वसुली केली आहे. यात एमएम शिंदे आणि डी कुमार, तर मुंबई डिव्हीजनणधील चीफ तिकीट इंस्पेक्टर रवी कुमार यांचे नाव सामील आहे.

12 ते 13 तास ट्रेनमध्ये असतात

रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, एसबी गलांडे यांनी 22680 प्रवाशांकडून 1.51 कोटी रुपये वसुल केले. तर, एमएम शिंदे यांनी 16035 प्रवाशांकडून 1.07 कोटी आणि डी कुमार यांनी 15264 प्रवाशांकडून 1.02 कोटी रुपये वसुल केले. गलांडे यांनी सांगितले की, ती दिवसातील 12 ते 13 तास ट्रेनमध्ये असतात.

बातम्या आणखी आहेत...