आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटबंदीनंतर बेरोजगारीच्या दरात वाढ, मागील 45 वर्षांचा विक्रम निघाला मोडीत; NSSO च्या डेटामुळे झाला खुलासा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नवी दिल्ली : 2017-18 मध्ये भारतातील बेरोजगारीचा दर 6.1 टक्के राहिला. 1972 नंतरचा सर्वाधिक दर आहे. 1971 मध्ये बेरोजगारीचा दर 6 टक्के होता. यामुळे बेरोजगारीच्या बाबतीतल देशाने मागील 45 वर्षांचा विक्रम मोडीत काढला आहे. बिझनेस स्टँडर्डच्या माहितीनुसार नॅशनल सँपल सर्वे ऑफिसकडून लीक झालेल्या डेटामुळे हा खुलासा झाला आहे. 

 
नोटबंदीमुळे बेरोजगारात वाढ
नोटबंदीनंतर परिस्थिती बिघडली असल्याचा दावा करण्यात येत आहे. 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटबंदी करण्यात आली होती. यानंतरच्या झालेल्या बेरोजगारीच्या सर्वेमध्ये जुलै 2017 ते जून 2018 पर्यंतचे आकडेवारी दिली होती. हा अहवाल डिसेंबरमध्ये सरकारकडे सुपूर्द करण्यात आला होता. पण आतापर्यंत तो जारी करण्यात आला नाही. यामध्ये नोटबंदीनंतर सर्वाधिक बेरोजगारी वाढल्याचे आकडे असल्याचा दावा करण्यात येत आहे. राष्ट्रीय सांख्यिकी आयोगातर्फे याची मंजूरी मिळाल्यानंतरही हे आकडे जारी करण्यात आले नव्हते. यामुळे आयोगाचे कार्यकारी चेअरपर्सनसहित दोन सदस्यांनी राजीनामा दिला आहे. 

 

शहरी भागात सर्वाधिक बेरोजगारीचा आकडा 
रिपोर्टनुसार शहरी भागात सर्वाधिक बेरोजगारीची समस्या आहे. बेरोजगारीचा दर शहरी भागात 7.8 तर ग्रामीण भागात 5.3 टक्के आहे. यादरम्यान ग्रामीण भागाताली सुशिक्षित महिलांचा बेरोजगारी दर 17.3 टक्के आहे. आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. यापूर्वी 2011-12 मध्ये हा दर 15.2 टक्के होता. तर ग्रामीण भागातील शिक्षित पुरुषांचा बेरोजगारी दराचा आकडा 10.5 टक्के आहे. 

 

लोकसभा निवडणुकीत सरकारला होऊ शकतो तोटा
लोकसभा निवडणुकीपुर्वी हे आकडे समोर आल्याने सरकारच्या अडचणींत वाढ होऊ शकते. या आकड्यांमुळे लोकसभा निवडणुकीत नुकसना सहन करावे लागू शकते. निवडणुक काळात विरोधी पक्ष हाच मुद्दा उचलून धरण्याचा प्रयत्न करू शकतो.  

 

बातम्या आणखी आहेत...