ऑस्कर 2020 / प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला तरी यांचे पाय जमिनीवरच, या आहे यंदाच्या अवॉर्ड सोहळ्याच्या खास गोष्टी

अनेकांनी अभिनेत्याचे कौतुक करत लिहिले..., 'प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला तरी यांचे पाय जमिनीवरचं'

दिव्य मराठी वेब टीम

Feb 12,2020 10:48:00 AM IST

हॉलिवूड डेस्कः आॅस्कर पुरस्कार हा प्रतिष्ठेचा समजला जातो. या पुरस्कारासाठी कलाकार प्रचंड मेहनत घेतात. पुरस्कार मिळाल्यानंतर कलाकार खुश होतात. त्यांचा आनंद गगनात मावत नाही. अनेक कलाकार हवेत राहतात, नंतर ते जमिनीवर उतरायला तयार नसतात, असे मानले जाते. मात्र, यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात उत्कृष्ठ अभिनेत्याचा आॅस्कर पुरस्कार मिळाल्यानंतर अभिनेता जोकिन फिनिक्सने मैत्रिण मारासोबत फरशीवर बसून शाकाहारी बर्गर खाण्याचा आनंद घेतला. शिवाय तिच्यासोबत काही वेळ घालवला. मंगळवारी हा फोटो समोर आला. ग्रेग विलियम्सने हा फोटाे काढला आहे. या फोटोला प्रचंड पसंती मिळाली. अनेकांनी अभिनेत्याचे कौतुक करत लिहिले..., 'प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला तरी यांचे पाय जमिनीवरचं'


खास गोष्टी

  • ऑस्करमध्ये यंदा 70 टक्के शाकाहारी भोजन दिसून आले. यापूर्वी झालेल्या ७७व्या गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात पहिल्यांदाच शाकाहारी भोजन देण्यात आले होते. वुल्फगँग पुक हे २६ वर्षांपासून रात्रीच्या जेवणाची जबाबदारी सांभाळत आहेत.
  • 10 वर्षांनंतर अकॅडमी अवाॅर्डसच्या स्टेजवर भारतही दिसला. २००९ मध्ये एआर रहेमानच्या परफॉन्सच्या १० वर्षांनंतर भारतवंशी अभिनेता उत्कर्ष अंबुडकर ने स्टेजवर सादरीकरण केले.
  • बेस्ट अडॉप्टेड स्क्रीनप्ले पुरस्कार जिंकणारे तायका वेटीटी आपला ऑस्कर पुरस्कार आपल्या खुर्चीखाली लपवताना दिसले. तो व्हिडिओ व्हायरल झाला.
  • उत्कृष्ट दिग्दर्शक बोंग जून हो भाषणात म्हणाले की, या ट्राॅफीचे पाच तुकडे करून नामांकन मिळालेल्या दिग्दर्शकांना वाटण्याची इच्छा होत आहे.
  • नताली पोर्टमनने वेगळ्या शैलीत अकॅडमीचा विरोध केला. ती तेथे महिला दिग्दर्शकांचे नाव लिहिलेला पोशाख घालून आली होती. विशेष म्हणजे ज्या महिलांना या सोहळ्यात नामांकन मिळाले नव्हते त्यांचे नाव या पोशाखावर लिहिलेले होते.
  • स्कारलेट जोहान्सन भावी पती कोलिन जोस्टसोबत ऑफ शोल्डर गाऊनमध्ये दिसली. तिने डायमंड ईअरिंग घातले होते. त्याची किंमत 15 कोटी रुपये आहे.
  • बिली पोर्टर डिझायनर जाइल्स डिकॉनच्या क्यूपोला गाउनमध्ये दिसला. फोनिक्स डिझाइनच्या या पोशाखातील टॉप 24 कॅरेट सोन्याचे बनलेले आहे, तर स्कर्टवरदेखील सोन्याचे वर्क दिसले. त्याचे दागिने, हँडबॅग सर्व काही युनिक होते.
  • ऊर्जा बचतीसाठी एलईडी लाइट्स आणि 1500 रीसायकल बाटल्यांचा वापर करण्यात आला हाेता.
X