आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आलीशान लाईटहाऊसच्या देखरेखेसाठी निघाली दोन केअरटेकरच्या नोकरीची जाहिरात, मिळणार लाखो रूपये पगार; ही आहे पात्रता

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


सॅन फ्रान्सिस्को : कॅलिफॉर्निया येथील एका बेटावरील लाईट हाऊससाठी दोन केअरटेकरची आवश्यकता असल्याची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली होती. सध्या ही जाहिरात चर्चेचा विषय बनली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या दोन केअरटेकर्सना 91 लाख रूपयांपेक्षा जास्त पगार देण्यात येणार आहे. सीएनएन रिपोर्टच्या मते, ईस्ट ब्रदर लाइट स्टेशन नावाचे लाईटहाऊन सेन पाब्लो बेटावर आहे, 1874 मध्ये याची निर्मिती करण्यात आली होती. या अनुषंगाने हे लाईटहाऊन एक ऐतिहासिक वास्तू आहे. त्याकाळी समुद्रातील नाविकांना दिशा दर्शविण्याचे काम हे लाईटहाऊस करत होते. पण 1960 येईपर्यंत याला स्वयंचलित केले गेले. हे लाईटहाऊस आजही स्वयंचलित आहे. सध्या हे लाईटहाऊस यूएस कोस्टगार्ड यांच्याकडे आहे आणि याचा सांभाळ करण्याची जबाबदारी 'ईस्ट ब्रदर इंक' या ग्रुपकडे सोपविण्यात आली आहे. 

 

कशी झाली लाईटहाऊसची सुरुवात 

- 1979 मध्ये बेटावर येणाऱ्या पाहूण्यांसाठी हे लाईटहाऊस सुरू करण्यात आले होते. याठिकाणी त्यांची राहण्याची आणि नाश्त्याची व्यवस्था करण्यात येत होती. येथील महापौर आणि लाईटहाऊस ग्रुपचे मुख्य टॉम बट यांनी याठिकाणी 40 वर्षांपर्यंत काम केले आहे. यानंतर हे लाईटहाऊस निर्जनपणे सोडण्यात आले होते. यानंतर येथून पैसा मिळविण्यासाठी  याला पुन्हा एकदा सुरू करण्यात आले. आता याठिकाणी येणाऱ्या पाहूण्यांमार्फत मिळणाऱ्या उत्पन्नातून लाईटहाऊसचा खर्च सांभाळला जातो. 

- टॉमने सांगितले की, येथील युनिक लोकेशन याचे वैशिष्ट्य आहे. एका लाईटहाऊसवर राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था असणारे सॅन फ्रान्सिस्को मधील एकुलते एक लाईटहाऊस आहे. 

 

नोकरीसाठी ही असेल पात्रता

- लाईटहाऊसचा सांभाळ आणि त्यावर लक्ष ठेवण्यासाठी कंपनीने दोन केअरटेकरच्या नोकरीची जाहिरात दिली होती. ईस्ट ब्रदरच्या संकेतस्थळानुसार नोकरी मिळणाऱ्या व्यक्तीला हॉस्टिटॅलिटीचा अनुभव असणे आवश्यक आहे. याशिवाय त्याच्याकडे यूएस कोस्ट गार्ड कमर्शियल बोट ऑपरेटींगचे लायसेन्स असणोल आवश्यक आहे.  

- सोबतच उच्च प्रतीचे अन्न सर्व्ह करणे, हाउसकीपिंग तसेच प्रवाशांना मॅनलँड ते आयलँडपवर आणण्याची आणि नेण्याचे काम करणे माहीत असणे आवश्यक आहे.
 

 

बातम्या आणखी आहेत...