Home | Maharashtra | Pune | highprofile sex racket busted in Pune li victoria spa in vimannagar

पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली कुंटणखाना; थाई तरुणांकडून करवून घेतला जात होता हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 11, 2019, 04:35 PM IST

तरुणींना पैशाचे आमिष दाखवून महिला दलालने वेश्या व्यवसाय करण्‍यास प्रवृत्त केले.

  • highprofile sex racket busted in Pune li victoria spa in vimannagar

    पुणे- विमाननगरात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. थाई तरुणींकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात असल्याचे समोर आले आहे.

    विमाननगर पोलिसांनी गुरुवारी रात्री ली व्हिक्टोरीया स्पा अॅण्ड सलून सेंटरवर छापा टाकला. थाईलंडहून आलेल्या पाच तरुणींची पोलिसांनी सूटका केली. या प्रकरणी पोलिसांनी एक महिलेसह दोघांना अटक केली आहे. बंटीकुमार कांतीभाई पटेल (27) असे महिला दलालाचे नाव आहे.

    विमाननगरात ली व्हिक्टोरीया स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप शिंदेयांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी स्पा सेंटरवर छापा टाकला. पाच थाई तरुणींकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याचे आढळून आले. पाचही तरुणी टुरिस्ट व्हिसावर थाईलंडमधून भारतात आल्या आहेत. तरुणींना पैशाचे आमिष दाखवून महिला दलालने वेश्या व्यवसाय करण्‍यास प्रवृत्त केले. पीडित तरुणींना महिला सुधारगृहात ठेवण्यात आले आहे.

Trending