आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमबॅक , पण नाइट शिफ्टमध्ये काम करणार नाही, दयाबेनने घातल्या अनेक अटी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: दयाबेन अर्थात दिशा वकानी 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या शोमध्ये कमबॅक करणार असे काही दिवसांपुर्वी वृत्त होते. आता या अभिनेत्रीने कन्फर्म केले आहे की, ती शोमध्ये कमबॅक करतेय. तिने एका मुलाखतीत सांगितले की, 'शोसाठी मी नेहमी प्रामाणित राहिल. मी मॅटरनिटी लिव्ह घेतली होती, शो सोडला नव्हता.' दया बेनच्या चाहत्यांसाठी चांगली बातमी आहे. परंतु चर्चा आहे की, तिने कमबॅक करण्यासाठी अनेक अटी मेकर्ससमोर ठेवल्या आहेत. वृत्तांनुसार तिने अट ठेवली आहे की, तिची फीस वाढवण्यात यावी, ती नाइट शिफ्टमध्ये काम करणार नाही आणि महिन्यात फक्त 15 दिवसच काम करेल. यासोबतच दिशाने अनेक अटी ठेवल्या आहेत. 


एका वर्षानंतर शोमध्ये करतेय कमबॅक 
दिशा नसल्यामुळे मेकर्सने स्टोरीलाइनमध्ये अनेक बदल केले. परंतू आता जास्त बदल त्यांना करायचे नाही, यामुळे त्यांनी दिशाला परत येण्यास सांगितले आहे. कारण 'दयाबेन' या शोचे प्रसिध्द कॅरेक्टर आहे. यामुळे ते सहज दूस-या अभिनेत्रीला रिप्लेस करु शकत नाही.
- याच कारणांमुळे चॅनल आणि प्रोड्यूसर असित मोदी, दिशाच्या परत येण्याची वाट पाहत होते. परंतू ती लवकर परत येण्यास तयार नव्हती. कारण तिला आपल्या पर्सनल लाइफला जास्त वेळ द्यायचा होता.
- मेकर्सने खुप रिक्वेस्ट केल्यानंतर तिने शोमध्ये परत येण्यास होकार दिला आहे. 

 

दयाबेनने ठेवल्या या अटी 
मॅटरनिटी लीव्हवर जाण्यापुर्वी दिशा प्रत्येक एपिसोडचे 1.25 लाख रुपये घ्यायची. आता तिने 20 टक्के ग्रोथ करण्याची मागणी केली आहे. म्हणजे तिला आता 1.50 लाख हवे आहेत. तिने मेकर्ससमोर अट ठेवली की, ती संध्याकाळी 6 वाजेनंतर काम करणार नाही. ती सकाळी 11 ते संध्याकाळी 6 वाजेच्या शिफ्टमध्ये काम करेल. सुरुवातीचे काही महिने ती नाइट शिफ्टही करणार नाही. जर टीमला नाइट शिफ्टमध्ये काम करायचे असेल तर तिला एक-दोन दिवसांपुर्वी सांगावे लागेल. यासोबतच ती महिन्यातून 15 दिवसच काम करेल, इतर अॅक्टर्स 22 ते 25 दिवस काम करतात. मेरक्सने तिच्या सर्व अटी मान्य केल्या आहेत.


नवरात्रीमध्ये घेणार एंट्री 
काही दिवसांपुर्वी दिशाने शोमध्ये एंट्रीचा सीक्वेंस शूट केला होता. यामध्ये ती जेठालाल, बापूजीसोबत बोलताना दिसतेय. या नवरात्रीमध्ये ती शोमध्ये पुर्णपणे एंट्री घेणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...