आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी सरकारची विद्यार्थ्यांसाठी मोठी भेट, रिसर्च फेलोशिपमध्ये झाली मोठी वाढ, जाणून घ्या कोणाला मिळणार लाभ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नवी दिल्ली : मोदी सरकारने निवडणुक वर्षात विद्यार्थ्यांना मोठी भेट दिली आहे. सरकारने पीएचडी धारक आणि इतर संशोधनकर्ता विद्यार्थ्यांच्या फेलोशिपमध्ये 7 हजार रूपयांपर्यंतची वाढ करण्याची घोषणा केली आहे. 1 जानेवारी 2019 पासून ही वाढ ग्राह्य धरण्यात येणार आहे. मोदींच्या कार्यकाळातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी वाढ आहे. यापूर्वी 2014 साली फेलोशिपमध्ये वाढ करण्यात आली होती.  

 
कसा असणार फेलोशिप स्लॅब
ज्युनियर रिसर्च फेलोशिपमध्ये प्रति माह 25 हजारांऐवजी 31 हजार रुपये मिळणार आहेत. तर सीनियर रिसर्च फेलोशिपमध्ये 28 ऐवजी 35 हजार रुपये प्रति महिना देण्यात येणार आहे. याशिवाय रिसर्च असोशिएटच्या मानधनात 11 ते 14 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे रिसर्च असोशिएटला आता पहिल्या वर्षी प्रतिमाह 47 हजार रुपये मिळणार. तर दुसऱ्या वर्षी 49 हजार आणि तिसऱ्या वर्षी 54 हजार रुपये प्रति महिना मिळणार आहे. 

 

 

पुढे वाचा....कोणत्या विद्यार्थी असेल यासाठी पात्र 

बातम्या आणखी आहेत...