आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Hiker Horror Discovery, Spiders Group Looks Like Hair

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एका खड्ड्याजवळ पडला होत केसांचा गुच्छा, मित्रांनी तो गुच्छ हटवताच पुढे जे काही घडले त्यामुळे त्यांना फुटला घाम; व्हिडिओ होत आहे व्हायरल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मेक्सिको : अमेरिकेतील सोनोरामध्ये दोन मित्रांनी एका विचित्र गोष्टीचा व्हिडिओ शूट केला आहे. हे दोघे येथील रस्त्यावर फिरत असताना एका खड्ड्याजवळ असलेल्या केसांच्या गुच्छ्यावर पडली. रस्त्यावर अचानकपणे केसांचा गुच्छा पडलेला पाहून दोघांनाही संशय आला. एक जण या घटनेचा व्हिडिओ शूट करत होता. तर दुसऱ्याने तो गुच्छा हटवताच असे काही झाले की, दोघांनाही घाम फुटला.  

 

> एकाने लाकडाने त्या गुच्छ्याला स्पर्श करताच त्यातून अचानक केसांसारखे कीडे बाहेर पडले. यानंतर दोघांनाही घाम फुटला. दोघेही आश्चर्यचकित झाले की, तो केसाचा गुच्छा नसून दुसरेच काहीतरी होते. 

 

एक्सपर्टने सांगितले नेमका कशाचा आहे तो गुच्छा

> यानंतर एकाला वाटले की, त्या गुच्छ्याखाली कीडे असतील. त्यामुळे त्याने त्या गुच्छ्याला हाताने उचलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यातील सर्व कीड्यांनी त्याच्यावर हल्ला चढविला. 

> हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एक्सपर्टने सांगितले की, तो गुच्छा नसून एका प्रकारचे कोळी आहेत. या काळ्या रंगाच्या कोळी समुहाने राहतात. यामुळे त्यांच्या समुह आपल्याला केसाच्या गुच्छ्याप्रमाणे दिसतो.