आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्राचीन काळ असो वा सध्याची मॉडर्न सोसायटी, महिला गर्भपाताविषयी सर्वांसमोर मोकळेपणाने चर्चा करू शकत नाही पण सध्याच्या काळात महिलांना डॉक्टरांकडे स्वतःच्या गर्भपाताविषयी बोलण्याचे स्वातंत्र्य आहे. प्राचीन काळी महिलांकडे याविषयावर कुटुंबियांशी आणि डॉक्टरांशी बोलण्याचेही स्वातंत्र्य नव्हते. यामुळे महिला घरातच अबॉर्शनच्या घातक पद्धतींचा अवलंब करीत असत. या पद्धती जाणून घेतल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकू शकते. येथे जाणून घ्या, प्राचीन काळातील गर्भपाताच्या पद्धती....
- योनी (Vagina) मध्ये जळू
नको असलेल्या गर्भ काढून टाकण्यासाठी पूर्वी महिला डॉक्टरांकडे जात नसत. महिला घरीच पुरातन पद्धतीचा वापर करत होत्या. विशेष म्हणजे पुरुष मंडळी त्यांना या गोष्टी करण्यास प्रवृत्त करत होते. या पद्धती अत्यंत असुरक्षित होत्या. महिलांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये जळू (लीच ) सोडले जायचे. जळू पोटात वाढत असलेला गर्भ खाऊन टाकत आणि महिलेचा गर्भपात व्हायचा, असा समज होता. महिला या गर्भपाताच्या पद्धतीचा घरीच वापर करत असत.
गरम पाण्याने स्नान
काही महिला गरम पाण्याने स्नान करतात. मान्यतेनुसार प्रग्नेंसी काळात योनी ((Vagina) पिशवी उघडी राहते आणि यामधून खूप गरम पाणी शरीरात गेल्यात तयार झालेले फिटस मरून जाते. या पद्धतीनेही अबॉर्शन केले जात होते.
शॉक थेरपी
पूर्वी शॉक थेरपीद्वारे गर्भपात केला जात असे. गरोदर महिलेला भूल (अनेस्थिशिया) न देता तिचा दात काढला जायचा. महिलेला प्रचंड वेदना होईल आणि तिचा गर्भपात होईल, असा समज होता.
धोकादायक अवजारांचा वापर
सध्याच्या काळात गर्भपात करणे बेकायदेशीर आहे परंतु प्राचीन काळातील महिला धोकादायक अवजारांचा वापर गर्भपात करण्यासाठी करत असत. उदा. Urinary Catheters, Forceps and Speculum.
स्पॅनिश माशीचे विष
महिला अबॉर्शन करण्यासाठी स्पॅनिश माशीच्या विषाचा वापर करण्यासाठी घाबरत नव्हत्या. यामुळे गर्भाचा लगेच मृत्यू होत असल्याचे मानले जाचे.
शोभेची दारू
गर्भपात करण्यासाठी महिला शोभेच्या दारूचा (Gunpowder)वापर करत होत्या. ही दारू पाण्यातून गिळून गर्भपात केला जायचा.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, पुरातन काळात महिला गर्भपातासाठी या जीवघेण्या पद्धतींचा करत वापर..
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.