आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हसून-हसून पोट दुखेल! पाहा कार्ड स्वाइप करताच अशा निघाल्या नोटा, 1 कोटी वेळा पाहिला गेला हा व्हिडिओ...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेशल डेस्क - इंटरनेट फुकट भाव मिळत असताना जणू सगळेच क्रिएटिव्ह झाले आहेत. सकाळी झोपेतून उठल्यानंतर सोशल मीडियावर काय व्हायरल होईल याचा नेम लागत नाही. गंमत-जंमत करताना लोक काहीही कारनामे करतानाचे व्हिडिओ करून ते पोस्ट करत आहेत. त्यापैकीच एक व्हिडिओ हसून पोट दुखवण्यासाठी पुरेसा आहे. एटीएम मशीनमधून पैसे कसे काढतात हे जवळपास सर्वांनाच माहिती आहे. कार्ड स्वाइप करा, सीक्रेट पिन टाका आणि रक्कम ठरवल्यानंतर ती बाहेर येईल. परंतु, दोन मुलांनी एक विचित्र एटीएम मशीन दाखवली. 


या व्हिडिओमध्ये एक तंदुरुस्त मुलगा शर्ट न घालता बेंचवर बसलेला आहे. त्याचे वजन अधिक असल्याने अक्षरशः पोटात 4 ते 5 टायर तयार झाले आहेत. बाजूलाच बसलेला त्याचा मित्र त्या टायरपैकी एकामध्ये कार्ड स्वाइप करतो. कार्ड स्वाइप करता आतमध्ये घेतलेली ढेरी तो खुली सोडतो आणि नोटा बाहेर येतात. फेसबूकवर Zachary Itibus या यूझरने अपलोड केलेला व्हिडिओ लोकांना इतका हसवतोय की तो आतापर्यंत 1 कोटीपेक्षा अधिक लोकांनी पाहिला. तसेच पाहणाऱ्यांची सख्या आणखी वाढत आहे.

बातम्या आणखी आहेत...