Home | International | Other Country | hillary clinton backs pakistan over laden issue

अमेरिकेचे घुमजाव; हिलरी क्लिंटन यांच्याकडून पाकची पाठराखण

वृत्तसंस्था | Update - May 27, 2011, 04:32 PM IST

ओसामा बिन लादेन याच्या मृत्यू प्रकरणी पाकिस्तानला हिलरी क्लिंटन यांनी क्लिन चीट दिली.

  • hillary clinton backs pakistan over laden issue

    वॉशिंग्टन - भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला तर त्यामुळे अणु युद्धाचा धोका वाढेल. या तणावामुळे दहशतवादी अण्वस्त्रांवर कब्जा मिळवू शकतील, अशी शक्यता अमेरिकेतील सिनेटरनी व्यक्त केलीये.    गेल्या दोन मे रोजी ओसामा बिन लादेन याला मारल्यानंतर त्या ठिकाणी मिळालेल्या टेप्समधूनही या धोक्याची माहिती मिळते. अणु आणि रासायनिक अस्त्रांवर कब्जा मिळवणे धार्मिक कर्तव्य असल्याचे ओसामाने आपल्या साथीदारांना सांगितले होते, असे या टेप्सवरून स्पष्ट होतंय. रिपब्लिकन पक्षाचे सदस्य लूगर यांनी या टेप्सच्या आधारे सांगितले की, लादेनचा मृत्यू झाला असला, तरी अण्वस्त्रे दहशतवाद्यांच्या हातात पडण्याचा धोका अजून कायम आहे.
    आपल्याकडील अण्वस्त्रे सुरक्षित ठिकाणी असल्याचा दावा पाकिस्तानी सरकार सातत्याने करीत आहे. परंतु, तेथील सरकार दहशतवाद्यांचे सातत्याने होणार हल्ले आणि ढासळत्या आर्थिक परिस्थितीमुळे नाकर्ती झाल्यास त्याचा दावा कधीही फोल ठरू शकतो.    दरम्यान, कोणत्याही पूर्वनियोजित कार्यक्रमाशिवाय शुक्रवारी पाकिस्तानमध्ये पोचलेल्या अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांनी पाकिस्तानचीच पाठराखण केली. लादेन याच्या मृत्यू प्रकरणी पाकिस्तानला त्यांनी संपूर्णपणे क्लिन चीट दिली. इस्लामाबादमध्ये नेत्यांशी चर्चा केल्यानंतर एका पत्रकार परिषदेत क्लिंटन म्हणाल्या, लादेन पाकिस्तानातच लपून बसला होता, याची तेथील सरकारला माहिती असल्याचा कोणताही पुरावा अमेरिकेला मिळालेला नाही. पाकिस्तानात अमेरिकाविरोधी भावना भडकल्याची आपल्याला माहिती असल्याचे त्यांनी सांगितले.Trending