आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिमाचल :पुलाचा कठडा तोडून बस नदीत कोसळली; 9 ठार, 43 जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेणुकाजी - हिमाचल प्रदेशमध्ये ददाहू येथून नाहनला जाणारी एक खासगी बस रविवारी पुलाचा कठडा तोडून नदीत कोसळली. या अपघातात ९ जण ठार झाले, तर ४३ जण जखमी झाले. मृतांत चार महिलांचाही समावेश आहे. जखमी प्रवाशांनी सांगितले की, बस खूपच वेगात होती, त्यामुळे चालकाचे तिच्यावरील नियंत्रण सुटले होते.

 

बसमध्ये ५२ प्रवासी होते. प्रशासनाने अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. घटनास्थळी पोहोचलेले सिरमौरचे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी आदित्य नेगी यांनी सांगितले की, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम 
सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...