आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शूज घालून बॉयफ्रेंडसोबत गणपतीसमोर हिना खानने काढले फोटो, चिडलेल्या लोकांनी सुनावले खडे बोल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेत अक्षराच्या नावाने प्रसिद्ध झालेली अभिनेत्री हिना खान कायम कोणत्या ना कोणत्या वादात अडकत असते. यावेळी तिने चक्क गणपतीच्या मुर्तीसमोर शूज घालून बॉयफ्रेंडसोबत फोटो काढले. यामुळे तिच्यावर बरीच टीका होत आहे. हिना आणि तिचा बॉयफ्रेंड रॉकी जायस्वाल दोघांच्याही पायात बूट आहेत. हिनाचा हा फोटो बघून सोशल मीडिया यूजर्स चांगलेच भडकले आहेत. अनेकांनी हिंदू देवतेचा अपमान केल्याने तिला खडे बोल सुनावले आहेत.

 

अंकिता भारती नावाच्या एका ट्विटर यूजरने लिहिले, ''तुम्हा दोघांना थोडी तरी लाज वाटते का? तुमच्या दोघांचाही कुणीही आदर करु शकत नाही.'' तर शिल्पा नावाच्या आणखी एका यूजरने लिहिले, ''हिला कोमोलिका बनवायची गरज काय, ही तर ख-या आयुष्यातच कोमोलिका आहे." 'कसौटी जिंदगी की' या मालिकेतील व्हिलनचे नाव कोमोलिका होते. आता 'कसौटी जिंदगी की 2' मध्ये हे पात्र हिना खान साकारणार आहे. काही दिवसांपूर्वी शिल्पा शिंदे हिने हिना खानला  'बिग बॉस'च्या घरातील कोमोलिका म्हटले होते.

 

रमजानला देखील ट्रोल झाली होती हिना खान...
हिनाने मे 2018 मध्ये रमजानच्या महिन्यात स्वतःचा एक हॉट व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ समोर आल्यानंतरसुद्धा तिच्यावर खूप टीका झाली होती. एका यूजरने लिहिले होते, 'रमजानच्या महिन्यात तरी असा ड्रेस घालू नकोस.' एकाने लिहिले, 'अरे हिना, असा डान्स करु नकोस. रमजान सुरु आहे.' 

 

9 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत हिना आणि रॉकी...

हिना आणि तिचा बॉयफ्रेंड रॉकी जायस्वाल नऊ वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांची पहिली भेट 'ये रिश्ता क्या कहलाता है' (2009) च्या सेटवर झाली होती. हिना या शोमध्ये लीड अॅक्ट्रेस होती. तर रॉकी शोचा प्रोड्युसर होता. नंतर हिनाने हा शो सोडला. हिना मुस्लिम आहे, तर रॉकी हिंदू आहे. हे दोघेही लवकरच लग्न करण्याचा विचार करत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...