आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिना खानने शेअर केला वर्कआउट फोटो, तिच्या ड्रेसवर यूजर्सने केल्या अशा कमेंट्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: हिना खानने इंस्टाग्रामवर काही वर्कआउट फोटोज शेअर केले आहे. यासोबत तिने लिहिले, "The hotter you dress when you workout,the better you feel and the harder you workout" (जेव्हा तुम्ही वर्कआउट करता तेव्हा हॉट ड्रेस घालता... तुम्हाला चांगले वाटते आणि कठोर मेहनत करत राहता.) परंतू फोटोमध्ये तिचे बॅक दिसत असल्यामुळे सोशल मीडिया यूजर्स तिला ट्रोल करत आहेत. एका सोशल मीडिया यूजरने लिहिले "अपना धर्म चेंज करलो." तर अजून एका यूजरने कमेंट केली की, "फतवा काढला जाईल." तर काही सोशल मीडिया यूजर्स म्हणाले की, हिनाचा ड्रेस फाटलेला आहे. एका यूजरने लिहिले, "हिना जी तुमचा ड्रेस बॅक साइडने फाटला आहे."


जिममधील फोटोग्राफीमुळे होतेय ट्रोल 
- हिनाला जिममध्ये फोटोग्राफी करत असल्यामुळे ट्रोल केले जातेय. काही सोशल मीडिया यूजर्सने प्रश्न केले आहे की, जिममध्ये वर्कआउट करण्यासाठी जाते की, फक्त फोटोग्राफी करण्यासाठी जाते. एका सोशल मीडिया यूजरने लिहिले, "लोक जिममध्ये वर्कआउट करण्यासाठी जातात आणि ट्रेनरला ट्रेनिंग देण्यास सांगतात. परंतू येथे फोटो काढण्यासाठी जिम जॉइन करण्यात आले आहे. ट्रेनर बिचारा फोटोग्राफी करतोय." 
- 'बिग बॉस 11' मध्ये सहभागी झाल्यानंतर हिनाने 'वारिस', 'इंडिया बनेगा मंच' आणि 'भाग बकुल भाग' मध्ये कॅमिओ केला आहे. परंतू तिच्या जवळ कोणताही फिक्स रोल नाही. रिपोर्ट्सनुसार, ती एकता कपूरचा नवा शो 'कसौटी जिंदगी के'मध्ये वॅम्प रोल करु शकते. 

 

 

बातम्या आणखी आहेत...