Home | News | Hina Khan is set to make her debut at the prestigious Cannes Film Festival 2019

कान्समध्ये रेड कार्पेट डेब्यूसह इंडियन पॅव्हिलियनमध्ये भाषण करणार हिना खान, 'लाइन्स' चित्रपट करणार लॉन्च

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 13, 2019, 12:33 PM IST

11 दिवस चालणाऱ्या फिल्म फेस्टिवलमध्ये कंगना आणि दीपिकाची राहणार उपस्थिती

 • Hina Khan is set to make her debut at the prestigious Cannes Film Festival 2019


  बॉलीवूड डेस्क - 14 मे पासून फ्रेंच रिवेरामध्ये कान्स फिल्म फेस्टिवलला सुरुवात होणार आहे. यावेळी हिना खान कान्समध्ये डेब्यू करतीये. येथे ती कारगिल युद्धावर बनलेला 'लाइन्स' चित्रपटाचा फर्स्ट लुक लॉन्च करणार आहे. या फेस्टिवलला कंगना राणावत, सोनम कपूर, ऐश्वर्या राय बच्चन, दीपिका पादुकोण, एकता कपूर आणि प्रसून जोशी उपस्थित राहणार आहेत.

  माझ्यासाठी हा एक मोठा सन्मान आहे - हिना

  कान्सच्या आमंत्रणाबाबत हिना म्हणते की, 'हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. मी वर्षानुवर्षे कान्स फेस्टिवलला फॉलो करत आहे. येथे आपले काम दाखवण्यासाठी जगभरातील फिल्म मेकर्स येत असतात. तुम्हाला एकाच ठिकाणी निवडक रचनात्मक लोकांशी भेटण्याची संधी मिळते. स्वतःला क्रिएटिव लोकांसमोर सादर करण्याची संधी मिळते. याशिवाय मी चित्रपटाविषयीचे माझे विचार, चित्रपट सृष्टीविषयी आणि माझ्या प्रवासाविषयी येथे चर्चा करू शकणार आहे. यामुळे मी स्वतःला नशीबवान समजते.'


  11 दिवस चालणार कान्स फिल्म फेस्टिवल
  कान्स फिल्म फेस्टिवल 11 दिवस चालणार आहे. यामध्ये वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळे सेलिब्रिटीज रेड कार्पेटवर दिसणार आहेत. 16 ते 18 मे दरम्यान दीपिका आणि कंगना फेस्टिवलवमध्ये उपस्थिती दर्शवणार आहेत. दरम्यान हिना येथे इंडियन पॅव्हिलियन मध्ये भाषण देणार आहे.

 • Hina Khan is set to make her debut at the prestigious Cannes Film Festival 2019
 • Hina Khan is set to make her debut at the prestigious Cannes Film Festival 2019

Trending