आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीव्हीची 'बहू' 'अक्षरा'ने दाखवले एब्स, 'बिग बॉस'साठी कमी केले होते 7 किलो वजन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : टीव्ही शो 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अक्षरा म्हणजेच हिना खानची गणना फिटनेस फ्रीकमध्ये केली जाते. ती नियमित वर्कआउट करते. यासोतबच आपल्या डायटकडे विशेष लक्ष ठेवते. हिनाने नुकताच आपला एक वर्कआउट व्हिडिओ आणि फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. यामध्ये ती एब्स दाखवताना दिसतेय. हिनाचा फिटनेस पाहून 'बिग बॉस 11' मध्ये कतरिना कैफनेही तिच्या एब्सची स्तुती केली होती. 'बिग बॉस-11' साठी हिनाने 7 किलो वजन कमी केले होते. 

 

वर्कआउटसोबत कॉम्प्रमाइज करत नाही हिना 
- हिना कधीच वर्कआउट टाळत नाही. 'खतरों के खिलाडी' मध्ये जाण्यापुर्वी तिने आपल्या बॉडीवर खुप काम केले होते. हिना वर्कआउटसोबतच किक-बॉक्सिंगही करते. 
- 'बिग बॉस 11' नंतर हिनाने आपला पहिला अॅक्टिंग प्रोजक्ट साइन केला आहे आणि याची शूटिंगही सुरु केली आहे. हा प्रोजक्ट एक शॉर्ट फिल्म आहे. 'स्मार्ट फोन' असे शॉर्ट फिल्मचे नाव आहे. अंकुश भट्ट याचे डायरेक्शन करत आहे. यासोतबच एकता कपूरच्या 'कसौटी जिंदगी की 2' मध्ये ती कोमोलिकाच्या भूमिकेत दिसू शकते. 


दिवसातून 12 ग्लास पाणी पिते हिना 
हिना सांगते की, "आपण जे खातो ते आपल्या चेह-यावर रिफलेक्ट होते. आपला चेहरा आपल्या इंटरनल सिस्टमचा आरसा असतो. मी दिवसभरात कमीत कमी 12 ग्लास पाणी पिते. यामुळे माझी सिस्टम क्लिअर होते. प्रत्येक दोन दिवसांना कोकोनट वॉटर पिते. एक वाटी दही खाणेही गरजेचे आहे. व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियन दोन्ही प्रकारचे पदार्थ खाते. परंतू कधीच जास्त खात नाही. हेल्दी बॉडीसाठी बॅलेन्स डायट खुप गरजेची असते. बॉडी हेल्दी असेल तर त्वचेवरचा ग्लो वाढतो."


या शोजमध्ये दिसली आहे हिना 
हिनाचा जन्म श्रीनगरमध्ये झाला. 2009 मध्ये तीने 'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून डेब्यू केला होता. 'ये रिश्ता...'च्या दरम्यान ती साडीमध्ये दिसली होती. तर 'बिग बॉस' मध्ये ती वेस्टर्न आउटफिटमध्ये दिसली. या शोससाठी तिने शोमध्ये एंट्री घेण्यापुर्वीच आउटफिट पर्सनली चूज केले होते. 'बिग बॉस 11' हा हिनाचा दूसरा रियालिटी शो होता. यापुर्वी ती 'खतरो के खिलाडी 8' मध्ये होती. यामध्ये ती फर्स्ट रनरअप राहिली होती. हिना  'परफेक्ट ब्राइड', 'मास्टरशेफ- किचन के सुपरस्टार्स' आणि 'इंडिया बनेगा मंच' सारख्या रियालिटी शोजमध्येही दिसली आले. यामध्ये तिचा फक्त स्पेशल अपीयरेन्स होता. 

बातम्या आणखी आहेत...