आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिना खानने घेतला एकता कपूरचा शो सोडण्याचा निर्णय, स्वतः सांगितले 'कसौटी जिंदगी की 2'मध्ये कधीपासून दिसणार नाही 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. हिना खानने एकता कपूरच्या 'कसौटी जिंदगी की 2' हा शो सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ती कोमोलिकाची भूमिका साकारत होती. रिपोर्ट्सनुसार ती एका चित्रपटासाठी शोला रामराम ठोकणार आहे. मार्च महिन्यापासून हिना या शोमध्ये दिसणार नाही असे वृत्त आहे. एका एन्टटेनमेंट पोर्टलसोबत बोलताना हिनाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ती म्हणाली की, "मी मार्चनंतर या शोमध्ये दिसणार नाही हे सत्य आहे. पण याचे एकच कारण आहे ते म्हणचे मला एका फिल्मला दिलेले जुने कमिटमेंट पुर्ण करायचे आहे."

 

हिना पुन्हा शोमध्ये परत येणार की नाही याविषयी तिने काहीच सांगितलेले नाही 
- बोलताना हिनाला ती कधी परत येणार याविषयी विचारण्यात आले. यावर ती म्हणाली की, "मी परतणार की नाही, हे परिस्थितीवर ठरेल." हिना शोमधील तिच्या भूमिकेमुळे नाखुश आहे का याविषयी तिला विचारण्यात आले. यावर ती म्हणाली की, "प्रोडक्शन टीमला वाटते की, मी थांबावे. शो सोडण्याचा निर्णय माझा आहे आणि मी फिल्ममुळे शो सोडत आहे. त्यांनी मला समजून घेतले आणि मला ब्रेक देण्यासाठी तयार झाले. तुम्हाला माहित नाही, मी परतही येऊ शकते." हिना खान आपला मित्र हुसैन खानच्या अनटायटल्ड चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करत आहे. कश्मीर मुद्द्यावर हा चित्रपट तयार होतोय. यामध्ये हिना एका खुल्या विचारांच्या मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. 


 

बातम्या आणखी आहेत...