Home | TV Guide | Hina khan Workout Video Viral

हिना खानचा वर्कआउट व्हिडिओ व्हायरल, जिममध्ये एक्सरसाइज करताना दिसली, फिटनेससाठी करते किक-बॉक्सिंग, बिग बॉससाठी कमी केले होते वजन 

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 27, 2019, 12:00 AM IST

दिवसातून 12 ग्लास पाणी पिते हिना, घेते बॅलेन्स डायट 

 • Hina khan Workout Video Viral

  मुंबई. 'बिग बॉस-11' ची रनरअप आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम हिना खान आपल्या नवीन वर्कआउट व्हिडिओमुळे चर्चेत आहे. हिना खानने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती जिममध्ये घाम गाळताना दिसतेय. हिना व्हिडिओमध्ये शोल्डर टोन्ड करण्याची एक्सरसाइज करताना दिसती. ती वारंवार वजन उचलून थकून जाते पण हिना हार मानत नाही आणि आपले सेट पुर्ण करते. हिनाने टिव्हीच्या सर्वात स्टायलिश अॅक्टरचा किताब जिंकला आहे. हिना खान हार्ड वर्कआउट करणा-या अभिनेत्रींमधून एक आहे. हिना रोज फक्त वर्कआउट करत नाही तर बॅलेन्स डायट घेते. हिनाच्या फिटनेसमुळे 'बिग बॉस-11' मध्ये कतरिना कैफनेही तिच्या एब्सची स्तुती केली होती. 'बिग बॉस-11'साठी हिनाने 7 किलो वजन कमी केले होते. हिना सध्या एकता कपूरच्या 'कसौटी जिंदगी की 2' मध्ये कोमोलिकाची भूमिका साकारतेय.

  वर्कआउटसोबत समझोता करत नाही हिना
  - हिना कधीच वरर्कआउट टाळत नाही. 'खतरो के खिलाडी'मध्ये जाण्यापुर्वीही तिने आपल्या बॉडीवर खुप काम केले होते. हिना वर्कआउटसोबतच किक-बॉक्सिंगही करते.
  - 'बिग बॉस 11'नंतर हिनाने आपला पहिला अॅक्टिंग प्रोजेक्ट साइन केला आहे आणि याची शूटिंगही सुरु झाली आहे. हा प्रोजेक्ट एका शॉर्ट फिल्म 'स्मार्ट फोन' आहे. अंकुश भट हे डायरेक्ट करत आहेत.

  दिवसातून 12 ग्लास पाणी पिते हिना
  - हिना म्हणते की, "आपण जे खातो ते आपल्या चेह-यावर रिफ्लेक्ट होते. आपला चेहरा आपल्या इंटरनल सिस्टमचा आरसा असतो. मी दिवसभर कमीत कमी 12 ग्लास पाणी पिते. यामुळे माझे सिस्टम क्लिअर होते. प्रत्येक दोन दिवसांना नारळपाणी पिते. एका वाटी दही अवश्य खाते. व्हेजिटेरियन आणि नॉनव्हेजिटेयन दोन्ही प्रकारचे पदार्थ खाते. पण कधीच जास्त खात नाही. हेल्दी बॉडीसाठी बॅलेन्स डायट खुप गरजेची असते. बॉडी हेल्दी असेल तर त्वचेचा ग्लो वाढतो."

Trending