आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Hina Khan's First Bollywood Film Gets Release Date, Hacked Release On 31st Jan 2020

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिना खानच्या पहिल्यावहिल्या बॉलिवूड फिल्मला मिळाली रिलीज डेट, या खास दिवशी बॉक्स ऑफिस होणार 'हॅक्ड'

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री हिना खान लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. हॅक्ड हे हिनाच्या पहिल्यावहिल्या बॉलिवूड फिल्मचे शिर्षक असून याचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. चित्रपटाच्या रिलीजची तारीख निश्चित झाली असून हा चित्रपट 31 जानेवारी 2020 रोजी रिलीज होणार आहे. विशेष म्हणजे याचदिवशी हिनाचा वाढदिवस असतो. हिनाने चित्रपटातील तिची झलक इन्स्टाग्रामवर शेअर करुन रिलीज डेटचा उलगडा केला. बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम भट या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे. चित्रपटात डिजिटल आणि सोशल मीडियाच्या निगेटिव्ह बाजूवर भाष्य केले गेले आहे.