Home | International | Other Country | Hindi is the third official language in Abu Dhabi now

अबूधाबीत आता हिंदी तिसरी अधिकृत भाषा; हिंदी भाषिक लोकांपर्यंत न्याय पोहोचवण्यासाठी घेतला निर्णय 

वृत्तसंस्था | Update - Feb 11, 2019, 10:29 AM IST

अबुधाबीच्या न्याय विभागाचे (एडीजेडी) सचिव युसूफ सईद अल अब्री याबद्दलची माहिती दिली.

  • Hindi is the third official language in Abu Dhabi now

    दुबई- अबुधाबी प्रशासनाने इंग्लिशनंतर हिंदीला न्यायालयाच्या तिसऱ्या अधिकृत भाषेचा दर्जा देऊन न्यायालयीन कामकाजात तिचा समावेश केला आहे. हिंदी भाषिक लोकांपर्यंत न्याय पोहोचवणे सुलभ व्हावे या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

    अबुधाबीच्या न्याय विभागाचे (एडीजेडी) सचिव युसूफ सईद अल अब्री याबद्दलची माहिती दिली. अरबी, इंग्लिश व हिंदी भाषेला न्यायदान प्रक्रियेतील भाषेच्या माध्यमांत स्थान दिले आहे. यांनी सांगितले की, न्यायदानाला अधिक पारदर्शक करण्याचा प्रयत्न आहे.अबू धाबी संयुक्त अरब अमिरातीची राजधानी आहे. यूएईची एकूण लोकसंख्या ९४ लाख आहे. त्यात २६ लाख भारतीय राहतात.

Trending