आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Hindi Language Day Special : Hindi Language Is Still At Upper Level In Cinema Industry

हिंदी भाषा दिन विशेष : बॉलिवूडमध्ये हिंदी भाषेचे वर्चस्व कायम ! सिने उद्योगात इंग्रजीचा बोलबाला असल्याचा समज खोटा ठरवत आहेत काही लोक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : हिंदी भाषेच्या प्रचारात हिंदी चित्रपटांची भूमिका साहित्यापेक्षाही माेठी आहे. हे अतिशयोक्तीपूर्ण वाटेल, परंतु हे खरं आहे. हिंदी चित्रपटसृष्टीबद्दल आतापर्यंत सामान्य समज होता की, हिंदीच्या जोरावर चालणाऱ्या या उद्योगात हिंदीकडे दुर्लक्ष केले जात आहे आणि इंग्रजीचा बोलबाला आहे. मात्र आता हा समज भूतकाळातला ठरला. आज हा उद्योग हिंदी भाषेचा गौरव करत आहे. यात हिंदी भाषिक निर्माते, अभिनेते आणि तंत्रज्ञांची संख्या वाढली आहे.

इंग्रजीचे निर्माते नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन सारख्या कंपन्या त्यांच्या वेब शोसाठी हिंदी हार्टलँड कथांवर जोर देत आहेत. अशा प्रकारे, हिंदी पट्ट्यातील लोक इंग्रजी पार्श्वभूमीतील लोकांच्या वर्चस्वाला आव्हान देत आहेत, जे वर्षानुवर्षे चित्रपट निर्मितीमध्ये आहेत. कलाकारंाची मुलेदेखील बाहेर जाऊन चित्रपट बनवण्याचे बारकावे शिकत आहेत, पण येथे येऊन ते हिंदी भाषेलाच महत्त्व देतात. परदेशातून येथे आलेले कलाकारदेखील बॉलिवूडमधील हिंदीचे वर्चस्व पाहून हिंदी शिकत आहेत.

हिंदीबहुल भागातील दिग्दर्शक आल्यामुळे झाला मोठा बदल. 
रोमन हिंदीमुळे दक्षिण आणि परदेशी गुंतवणूकदार, अभिनेत्यांना मदत मिळते. 
स्क्रिप्ट सॉफ्टवेअरमुळे रोमन हिंदीचे वर्चस्व वाढले. 

पंकज त्रिपाठी, हिंदीबहुल भागातून आलेला अभिनेता... 
आता भाषेचा मुद्दाच राहिला नाही. इंग्रजीची पार्श्वभूमी असलेले लोकांची संख्या जास्त होती. मात्र आत तसे नाही. हिंदी पट्ट्यातून लेखक, दिग्दर्शक आले आहेत. त्यांच्या सेटवर हिंदीच बोलली जाते. उदाहरण म्हणून अनुराग बासुच्या सेटवर बंगाली दिसून येतात. अनुराग कश्यपच्या सेटवर हिंदी बोलणारे जास्त असतात. शिवाय देवनागरी शिकवण्यासाठी सॉफ्टवेअरदेखील बनले आहेत. त्यामुळे देवनागरीमध्ये स्क्रिप्ट आणि संवाद लिहिले जात आहेत. इंडस्ट्रीत इंग्रजी बोलणाऱ्यांचा प्रभाव आमच्यावर पडतो, असा समज आता राहिला नाही. काही कलाकारांनी चार तर काहींनी नऊ महिन्यात हिंदी शिकली. काहींनी देवनागरी लिपी शिकली. अमिताभ बच्चन, परेश रावल, अनुपम खेर सारखे कलाकार आजही देवनागरीमध्ये स्क्रिप्ट घेतात.

आजच्या पिढीची नवी स्टार अनन्या पांडेच्या हिंदी आवडीबद्दल तिचे वडील चंकी पांडे सांगतात,
अनन्या हॉलिवूड चित्रपटसुद्धा कमी पाहते. तिला हिंदी चित्रपट आवडतात. ती कॉन्व्हेंटमध्ये शिकली तरी हिंदीवरील तिचे प्रेम कमी नाही. लोक कागदाऐवजी संगणकावर आणि आता मोबाइलवर टाइप करून कथा लिहित आहेत. माझ्या काळात जर मला कुणी रोमनमध्ये स्क्रिप्ट दिली तरी मी त्यांना रागावायचो. पुढच्या वेळेस हिंदीत लिहून द्या असे मी त्यांना सांगायचो. मीच काय अनिल कपूरलादेखील हिंदीत लिहिलेले संवाद आवडायचे.

प्रकाश भारद्वाज, आमिर खानला हिंदी शिकवणारा शिक्षक... 
ऋषी कपूर आणि त्यांच्या काळातील सर्व कलाकार हिंदी भाषेलाच जास्त महत्त्व देत होते. आमिर खानचे दोन्ही भाषेवर प्रभुत्व आहे. मिथुन चक्रवतीदेखील हिंदीत बोलत होते. शिवाय त्यांचा मुलगा नमोषीचे बोलणे ऐकून मी चकित झालो. त्याने लेखकाला सांगितले, हिंदी चित्रपट आहे त्यामुळे सवंाद हिंदीतच द्या. इंग्रजीत द्यायचे तर हॉलीवुडला जाऊन दे. मी पाहिले नाही पण ऐकले कॅटरिना कैफनेदेखील देवनागरी लिपी वाचणे सुरू केले आहे. निर्माते भूषण कुमार हिंदीतच संवाद लिहितात. त्यांना हिंदी बोलणे आणि ऐकणे आवडते. इतर मिक्स बोलणारे आहेतच. ज्यांना इंग्रजी येत नाही त्यांना मान-सन्मान मिळत नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. ठग्स ऑफ हिंदुस्तानचे विजय कृष्ण आचार्य तर कानपुरचे आहेत. बच्चनसाहेबाप्रमाणेच अभिषेकदेखील देवनागरी लिहितो, वाचतो.

मानव कौल अभिनेता... 
मानव कौल सांगतो..., आपल्या देशात हिंदी चित्रपटामुळेच हिंदी वाचली आहे. मी न्यूयॉर्कमध्ये होतो तेव्हा एक अफगानीने मला ओळखले व हिंदीत बोलू लागला. कारण तो संजय दत्तचा मोठा चाहता आहे. तेथेही लोक हिंदी चित्रपट पाहतात. जर्मनीला गेलो होतो तेव्हा एक जर्मनचा माणूस मेरा जूता हे जपानी गाणे म्हणत होता. हिंदी चित्रपटामुळेच हिंदीचा प्रसार झाला आहे. देवनागरीमध्येही स्क्रिप्ट मिळू लागल्या आहेत.

दीपक डोबरियाल, हिंदीला प्राधान्य देणारा अभिनेता... 
दीपक डोबरियाल सांगतो..., स्टुडियोमध्ये कथेचे संवाद इंग्रजीत असले तर लोक इंप्रेस होतात, असा समज होता, मात्र तसे काही नाही. आता प्रत्येकाला क्रिएटिव्हिटी आवडते, भाषेवर काही राहिले नाही. खरं तर, हिंदी बहुल भागातून जे लोक इंडस्ट्रीत आले आहेत त्यांच्यामुळे तर खूपच फरक पडला आहे. मग ते विशाल भारद्वाज असो की, आनंद एल राय, नीतेश तिवारी किंवा इतर कुणी.