आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​मराठी चित्रपट 'मला आई व्हायचे'चा हिंदी रिमेक बनवणार दिनेश विजान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: 'स्त्री' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर शंभर कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाचे यश पाहून दिग्दर्शक दिनेश विजान याने मराठी चित्रपट बनवण्याचा विचार केला आहे. तो एका मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवणार आहे. या चित्रपटाचे नाव मला आई व्हायचे, असे आहे. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपटाचे अधिकार दिनेश विजानने 40 लाखांत विकत घेतले आहेत. हिंदीच्या आधी तेलुगूमध्येदेखील याचा रिमेक बनवण्यात आला आहे. त्या वेळी निर्मात्याने याचे अधिकार फक्त 5 लाख रुपयांत घेतले होते. या हिंदी चित्रपटासाठी एका मोठ्या अभिनेत्रीला घेतल्याची चर्चा आहे. लवकरच याविषयी अधिकृत घोषणा केली जाईल. 


ट्रेड पंडितच्या मते, श्रद्धा कपूर किंवा ऐश्वर्या रॉय बच्चन यांच्या नावाची शक्यता असल्याचे सांगतात. स्त्रीने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींची कमाई केली. त्यामुळे श्रद्धाचे नाव समोर येत आहे, तर ऐश्वर्या एका सरोगसीवर आधारित 'जॅस्मिन' नावाच्या चित्रपटात काम करणार होती, अशी चर्चा होती. त्यात ती सरोगसी आईची भूमिका करणार होती. मात्र, तो कोणत्या तरी कारणामुळे रद्द झाला होता. असो, मूळ चित्रपटाची निर्माती समृद्धी पोरेने दिनेश विजानला हिंदीचे राइट्स दिल्याचे सांगितले आहे. मल्याळम, इंग्रजी आणि इतर भाषांचे राइट्स माझ्याकडे आहेत, असे त्या म्हणाल्या आहेत. हिंदी चित्रपटाची कथा त्याच लिहिणार आहेत. दिग्दर्शन अमर कौशिक करतील. मराठीत याला 1 कोटी 90 लाख रुपये लागले होते. 


- खरं तर, भारतात सरोगसीच्या नावावर महिलांना पुरेशा सुविधा दिल्या जात नाहीत. सरोगसीसाठी जितके पैसे मिळायला पाहिजेत तितके मिळत नाहीत, ते पैसे मध्यस्थ खातात. या सर्व गोष्टींमुळे सरोगसीचे प्रकरण कोर्टात रखडले आहे. भारतात अजून सरोगसीला कायदेशीर मान्यता मिळाली नाही. 

बातम्या आणखी आहेत...