• Home
  • National
  • Hindu and Muslim party lawyers are rivals in the court, but best friends outside

अयोध्या वाद / हिंदू आणि मुस्लिम पक्षाचे वकील न्यायालयात कट्टर विरोधक, मात्र बाहेर पक्के मित्र

अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनऊ खंडपीठापासून सुप्रीम कोर्टापर्यंत या दोघांनीही या प्रकरणात एकत्रित बाजू मांडली

Oct 13,2019 11:36:00 AM IST


नवी दिल्लीहून प्रमोद कुमार त्रिवेदी - सर्वोच्च न्यायालयातील अयोध्या वादाच्या सुनावणीदरम्यान हिंदू आणि मुस्लिम पक्षाचे वकील एकमेकांविरोधात वाद घालत आहेत, परंतु त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील परिस्थिती मात्र वेगळी आहे. 1989 पासून हिंदू पक्षाची बाजू मांडणारे हरिशंकर जैन आणि मुस्लिम पक्षाचे वकिल जफरयाब जिलानी कोर्टांत एकमेकांचे विरोधक असले तरी बाहेर मात्र ते पक्के मित्र आहेत. या खटल्याशी जोडलेले सुरुवातीच्या वकिलांच्या संबंधावर भास्कर App ने त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर ही रोचक बाब समोर आली.

कोर्टाची चर्चा कोर्टापर्यंत, पण बाहेरील संबंध वेगळे आहेत हरिशंकर

अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनौ खंडपीठातील खटल्याचे प्रतिनिधित्व करणारे हिंदू पक्षाचे वकील हरीशंकर जैन म्हणतात की जिलानी साहेब कोर्टात आमचे प्रतिद्वंदी असले तरी कोर्टाबाहेरचे आमचे संबंध खूप चांगले आहेत. आम्ही एकमेकांच्या मुलांच्या लग्नापासून प्रत्येक लहान-मोठ्या कार्यक्रमांत सहभागी होतो. कोर्टातील वादानंतर आम्ही सोबत चहा पितोjafaryab jilani, . अनेकवेळा जेवणही सोबत करतो. तर 1975 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयातून मुस्लिम पक्षाची वकिली सांभाळणारे जफरयाब जिलानी म्हणतात की आमचे नातेसंबंध अधिक चांगले आहेत. लखनऊ कोर्टात आम्ही सोबत चहा पित होतो. गरजेवेळी एकमेकांची मदत देखील करतो. कोर्टातील वाद हा कोर्टापर्यंतच आहे. पण आमचे संबंध वेगळे आहेत. आम्ही एकमेकांना मिठाई सुद्धा भरवतो.


महंत रामचंद्र दास तर खायला घालत - जिलानी

जिलानी सांगतात की जेव्हा महंत परमहंस रामचंद्र दास जिवंत होते, तेव्हा ते आम्हाला सोबत घेऊन जायचे आणि फैजाबादमधील वादविवादानंतर आम्हाला खायला घालायचे. आमचे वैयक्तिक संबंध दोन्ही बाजूंनी चांगले आहेत.

X