Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | hindu-funeral-shraaddha

अस्थि दहा दिवस का जतन करतात ?

धर्म डेस्क, उज्जैन | Update - May 26, 2011, 01:00 PM IST

खरे तर अस्थि संचय करण्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व आहे.

  • hindu-funeral-shraaddha

    अस्थिंचे 10 दिवस जतन करून अकराव्या दिवशी श्राद्ध आणि तर्पण करतात. हाडांमध्ये असे काय आहे की शरीराचे इतर अवयव सोडून हाडांचाच संचय करावा. खरे तर अस्थि संचय करण्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व आहे.
    हिंदू धर्म शास्त्रात अशी मान्यता आहे की मृत्यूनंतरही सूक्ष्म आत्मा त्याच स्थानी असते. आत्मा 13 दिवसापर्यंत आपल्या घरातच वास्तव्य करते. आत्म्याच्या तृप्तीसाठीच 13 दिवसापर्यंत श्राद्ध आणि इतर क्रीया केल्या जातात.
    अंत्यसंस्कारानंतर देहापैकी केवळ अस्थिच शिल्लक राहिलेल्या असतात. या अस्थित आत्म्याचे वास्तव्य असते असे समजण्यात येते. अग्नीसंस्कारामुळे रोगजंतू पूर्णपणे नष्ट झालेले असतात. त्यामुळे अस्थि घरी ठेवण्यात धोका नसतो. अस्थिंना स्पर्श करण्यातही अडचण नसते. या अस्थिंचे क्रीयाकर्म झाल्यानंतर त्या वाहत्या पाण्यात विसर्जित केल्या जातात.

Trending