आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • 'Hindu Is A Matter Which Involves Love, Affection, Cooperation, Trust, Without Any Reason Why Is Objection To Hindu Nation': Chandrakant Patil

'हिंदू ही व्यवहार, प्रेम, आपुलकी, सहकार्य, विश्वास यामध्ये समावलेली बाब, हिंदू राष्ट्रबद्दल विनाकारण आक्षेप कशासाठी' : चंद्रकांत पाटील

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

पुणे : हिंदू नावावर अनेकांना आक्षेप असून हिंदुत्व म्हणजे केवळ राम मंदिर मुद्दा असे नाही, तर हिंदू ही व्यवहार, प्रेम, आपुलकी, सहकार्य, विश्वास यामध्ये समावलेली बाब आहे. देशातील हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन असे वेगवेगळे समुदायाचे लाेक आपआपल्या पध्दतीने देवाची उपासना करतात आणि देशाची आपल्या परीने सेवा करतात या व्यवहाराने देशभरातील सर्व लाेक हेच हिंदू झाले, अशी आमची विस्तृत मांडणी आहे. यालाच आम्ही हिंदूराष्ट्र म्हणताे. मात्र, अनेकांना विनाकारण हिंदू राष्ट्राबद्दल आक्षेप असल्याचे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

सरहद संस्था आयोजित 'भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी ग्रंथालय' तसेच काश्मीर मोहत्सवाचा उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. सरहद संस्था अध्यक्ष संजय नहार, विश्वस्त शैलेश वाडेकर या वेळी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, संजय नहार यांच्यासोबत माझी विद्यार्थी दशेत अभविपमध्ये असल्यापासून ओळख जम्मू-काश्मीर मधून शिक्षणासाठी पुण्यात सरहद मध्ये दाखल हाेणाऱ्या १०० मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी लाेकसहभागातून मी घेताे. या सरकारने शेतकऱ्यांना दिलेली २ लाखांची कर्जमाफी तटपूंजी आहे. अजित पवार यांना याच सरकारने क्लीनचीट आहे. म्हणाले. पंकजा, खडसे नाराज नसल्याचे ते म्हणाले.

अंबाबाई पैसे कमी पडू देत नाही

राज्यात आमचे सरकार गेले असले तरी माझी ताकद खूप आहे. मी मूळ काेल्हापूरचा असून अंबाबाई माझ्यावर प्रसन्न असून राेज सकाळी ती मला आज तुला किती पैसे देऊ अशी विचारणा करते आणि त्याप्रमाणे कधी पैशांची कमतरता भासू देत नाही, असेही ते म्हणाले.
 

बातम्या आणखी आहेत...