आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Hindu Janajagruti Samiti Said Song Of 'Dabangg 3' Hurts Religious Sentiments, Demand For Cancellation Of Certificate

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'दबंग 3'वर वादाचे सावट, शीर्षक गीत ठरले कारणीभूत, सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्र न देण्याची हिंदू जनजागृती समितीची मागणी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
'हुड हुड दबंग...' या शीर्षक गीतातील या दृष्यावर आक्षेप घेण्यात आला आहे  - फोटो : यूट्यूब साभार - Divya Marathi
'हुड हुड दबंग...' या शीर्षक गीतातील या दृष्यावर आक्षेप घेण्यात आला आहे - फोटो : यूट्यूब साभार

बॉलिवूड डेस्कः सलमान खानचा आगामी ‘दबंग 3’ हा चित्रपट शूटिंगच्या काळापासूनच वादाच्या भोव-यात अडकला आहे. आता पुन्हा एकदा या चित्रपटातील एका गाण्यावरुन वादाला तोंड फुटले आहे. हिंदू जनजागृती समितीने या चित्रपटातील ‘हुड हुड दबंग’ या शीर्षक गीतावर आक्षेप नोंदवला असून सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला प्रमाणपत्र न देण्याची मागणी केली आहे.

हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या... 
‘हुड हुड दबंग’ हे गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं. ‘या गाण्यात सलमानसोबत साधूंना नाचताना दाखवले आहे.  या गाण्यात हिंदू साधू तसेच भगवान शिव, श्रीराम आणि श्रीकृष्ण यांचा अवमान करण्यात आल्याचा आरोप या समितीने केला आहे. त्यामुळे हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. सलमानने हिंदू साधूंचा अवमान केला आहे, तशा प्रकारे मुल्ला-मौलवी किंवा फादर-बिशप यांना नाचताना दाखवण्याचे धाडस दाखवेल का, असा प्रश्‍न हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी केला आहे.

हिंदू जनजागृती समितीच्या वतीने मुंबई येथे केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाकडे निवेदनाद्वारे ‘दबंग 3’ या चित्रपटातून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे प्रसंग वगळावेत आणि तोवर या चित्रपटाला सेन्सॉर प्रमाणपत्र देण्यात येऊ नये, अशी मागणी करण्यात आली.

शूटिंगच्या काळातही झाला होता वाद... 
चित्रपटावरुन पहिल्यांदाच वाद झाला असे नाही. यापूर्वीही चित्रपटामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप झाला आहे. शूटिंगच्या काळात महेश्वरमध्ये शिवलिंग झाकून ठेवल्यामुळे वाद झाला होता. 

सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा स्टारर 'दबंग 3'चे दिग्दर्शन प्रभूदेवा यांनी केले आहे. चित्रपटात किच्चा सुदीप, माही गिल, सई मांजरेकर झळकणार आहेत. येत्या 20 डिसेंबर रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.