आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Hindu Mahasabha And The Muslim Party Lawyers Reaction On Supreme Court Verdict About Ram Janmbhumi

सुप्रीम कोर्टाच्या ऐतिहासिक निर्णयावर हिंदू महासभा आणि मुस्लिम पक्षाचे वकील काय म्हणाले जाणून घ्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/अयोध्या -  सुप्रीम कोर्टाच्या 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने वादग्रस्त रामजन्मभूमी बाबत ऐतिहासिक निर्णय सुनावला आहे. वादग्रस्त जागा ही रामलल्लाचीच असल्याचे कोर्टाने सांगितले आहे. ट्रस्ट स्थापन करून तीन महिन्यांत मंदिर उभारण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. यासोबतच मुस्लिमांसाठी अयोध्येत अतिरिक्त पाच एकर जमीन देण्यात यावी असेही कोर्टाने म्हणले आहे. 

सुप्रीम कोर्टाच्या या ऐतिहासिक निकालाबाबत हिंदू महासभा आणि मुस्लिम पक्षांच्या वकिलांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

हिंदू महासभेचे वकील काय म्हणाले?
हिंदू महासभेचे वकील वरुण कुमार सिन्हा यांनी या निर्णयाला ऐतिहासिक म्हणत सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने या निकालाद्वारे एकतेचा संदेश दिला आहे. 

मुस्लिम पक्ष काय म्हणाले ?
सुन्नी वक्फ बोर्डाचे वकील जफरयाब जिलानी या निकालाबाबत म्हणाले की, आम्ही या निर्णयाचा सन्मान करतो, परंतु आम्ही त्यावर समाधानी नाही. पुढील कार्यवाहीबाबत लवकरच निर्णय घेऊ.