आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Hindu Mahasabha Youth President Ranjit Bachchan Shot Dead In Lucknow

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लखनऊमध्ये विश्व हिंदू महासभेचे प्रदेश अध्यक्ष रंजीत बच्चन यांची गोळी घालून हत्या

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हजरतगंजच्या ग्लोब पार्कजवळ सकाळी फिरायला गेले होते रणजीत, तेव्हा काही बाइकस्वारांनी हल्ला केला
  • ऑक्टोबर 2019 मध्ये लखनऊमध्येच हिंदू समाज पार्टीचे नेते कमलेश तिवारींची हत्या झाली होती

लखनऊ- येथील हजरतगंजमध्ये बाइक स्वारांनी विश्व हिंदू महासभेचे प्रदेश अध्यक्ष रणजीत बच्चन (40) यांची गोळी मारुन हत्या केली. ते आज(रविवार) सकाळी फिरायला बाहेर आले होते. या दरम्यान ग्लोब पार्कजवळ आरोपींनी त्यांच्यावर फायरिंग केली. रणजीत यांच्या डोक्यात अनेक गोळ्या लागल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या दरम्यान त्यांच्या भावालाही गोळीलागली आहे, सध्या त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी सांगितल्यानुसार, आज सकाळी अंदाजे सहा वाजता हिंदू महासभेचे अध्यक्ष रंजीत बच्चन आपल्या भावासोबत मॉर्निंग वॉकवर निघाले होते. हजरतगंज परिसरात सीडीआरआयजवळ काही बाइकस्वार हल्लेखोरांनी रणजीत आणि त्यांच्या भावावर गोळीबार सुरू केला. यात रणजीत यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा भाऊ जखमी झाला. 

सपाने हत्येचा तीव्र शब्दात निषेध केला
 
समाजवादी पार्टीने योगी सरकारवर टीका करत हल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. ट्वीटरवर लिहीले की, लखनऊमध्ये दिवसाढवळ हिंदू महासभेच्या अध्यक्षाची हत्या झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांचा पोलिसांवरील आणि सरकारवरील विश्वास उडाला आहे. मागच्या वर्षी 18 ऑक्टोबरमध्ये लखनऊमध्ये हिंदू समाज पार्टीचे अध्यक्ष कमलेश तिवारी यांची हत्या झाली होती. यूपी पोलिसांनी त्या आरोपींना गुजरातमधून अटक केले होते.