आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाण्‍यात हिंदु-मुस्लिम ऐकतेचे अनोखे प्रतिक, एकाच मंडपात गुंजते बाप्‍पाची आरती आणि अजान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - यंदा गणेशोत्‍सव आणि मोहरम एकाचवेळी येत आहे. यानिमित्‍ताने ठाण्‍यातील मुंब्रा परिसरात हिंदु-मुस्लिम ऐकतेचे अनोखे उदाहरण पाहायला मिळत आहे. येथे एकाच मंडपात एका बाजुला गणेशाची आरती करण्‍यात येते तर दुस-या बाजूला मोहरमची मजलिस सजवण्‍यात आली आहे.


एकतेचा संदेश
मुंब्रा परिसरातील चरणी पाडा येथे एकता मित्र मंडळातर्फे 10 दिवसांचा गणेशोत्‍सव साजरा केला जात आहे. तर मोहरमनिमित्‍त हुसेनी फाऊंडेशन कमिटीतर्फे 10 दिवसांची मजलिस सजवण्‍यात आली आहे. हिंदु आणि मुस्लिम धर्मियांचे हे दोन वेगवेगळे उत्‍सव येथे एकाच मंडपात साजरे केले जातात. याद्वारे येथील हिंदु-मुस्लिम समुदायांकडून समाजाला एकात्‍म‍तेचा संदेश दिला जातो.   

 

एकाच लाऊडस्‍पीकरचा करतात वापर
यातील विशेष बाब म्‍हणजे या मंडपात गणेश आरती आणि अजानसाठी एकाच लाऊडस्‍पीकरचा वापर केला जातो. येथे आरती होते तेव्‍हा अजान केली जात नाही आणि अजानदरम्‍यान आरती केली जात नाही. एकमेकांसोबत ताळमेळ ठेवून दोन्‍ही समुदाय अशाप्रकारे येथे सण साजरे करतात.  

बातम्या आणखी आहेत...