Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | hindu mythology good and bad habits

4 चुकीच्या सवयी, ज्यामुळे जीवनात अडचणी कायम राहतात आणि यश मिळत नाही

रिलिजन डेस्क | Update - Jan 14, 2019, 12:01 AM IST

आई-वडिलांची निंदा आणि स्वतःचे कौतुक करणारे लोक कधीही सुखी राहू शकत नाहीत

 • hindu mythology good and bad habits

  अनेक लोक जीवनात खूप मेहनत करतात परंतु जीवनातील अडचणी कायम राहतात. दुःख आणि अडचणींपासून दूर राहण्यासाठी शास्त्रामध्ये काही नीती सांगण्यात आल्या आहेत. पद्मपुराणाला हिंदू धर्मातील अठरा महापुराणांमध्ये गणले जाते. या पुराणामध्ये अशा 4 सवयींविषयी सांगण्यात आले आहे, ज्या कोणत्याही मनुष्याच्या आयुष्याला उद्धवस्त करण्यास कारणीभूत ठरतात. आयुष्यात नेहमी प्रगती आणि सुखाची इच्छा बाळगणाऱ्या लोकांनी या 4 गोष्टींपासून नेहमी दूरच राहावे.


  श्लोक -
  न चात्मानं प्रशंसेद्वा परनिन्दां च वर्जयेत्।
  वेदनिन्दां देवनिन्दां प्रयत्नेन विवर्जयेत्।।


  1. स्वतःचे कौतुक करू नका
  काही लोकांना स्वतःचे कौतुक करण्याची सवय असते. ही सवय मनुष्याला अहंकारी आणि स्वार्थी बनवते. हे लोक नेहमी स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ दाखवण्याचा प्रयत्न करतात. ही सवय कोणाच्याही आयुष्याला उद्धवस्त करू शकते. यामुळे या सवयीपासून दूरच राहावे.


  2. इतरांची निंदा करू नका
  एखाद्याची निंदा किंवा अपमान करणे, या दोन्ही गोष्टींना आपल्या शास्त्रामध्ये अत्यंत वाईट मानण्यात आले आहे. असे करणारे लोक नेहमी स्वतःचे मूळ काम विसरून जातात आणि इतर लोकांच्या मागे पडतात. यशाच्या मार्गावर पुढे जाण्याची इच्छा असल्यास इतरांची निंदा आणि अपमान करण्यापासून दूर राहा.


  3. देवाची निंदा करू नका
  अनेक लोक असेही आहेत जे देव आणि धर्मावर विश्वास ठेवत नाहीत. यांना धर्म ज्ञानाचे आणि देव भक्तीचे काहीही महत्त्व नसते. असा व्यक्ती धर्म आणि शास्त्रावर विश्वास नसल्यामुळे अधर्मी आणि पापी बनतो. जे लोक आई-वडिलांची निंदा करतात ते नेहमी दुःखी राहतात. असे लोक आयुष्यात कधीही यश आणि लाभ प्राप्त करू शकत नाहीत.


  4. वेदांचा अपमान करू नका
  वेद-पुराणांना हिंदू धर्मामध्ये पूजनीय मानले जाते. वर्तमानात लोकांमध्ये याचे महत्त्व नष्ट होत चालले आहे. अनेक लोक वेदांचा अपमान करण्यातही मागेपुढे पाहत नाहीत. ही सवय कोणत्याही मनुष्याला त्याच्या पतनाचे कारण ठरू शकते. यामुळे चुकूनही कधी वेद-पुराणांचा अपमान करू नका.

Trending