आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Hindu Organization Caught 20 People On Charges Of Smuggling Cattle, Slaying Gow Mata Ki Jai's Slogans

मध्यप्रदेशच्या खंडवामध्ये गाईची तस्करी केल्याच्या संशयात 20 जणांना पकडले, मारहाण करून 'गो माता की जय' अशा घोषणा द्यायला लावल्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खंडवा(मध्यप्रदेश)- गाईंची तस्करी केल्याच्या संशयामुळे हिंदू संघटनेच्या काही कार्यकर्तांनी ग्रामस्थांच्या मदतीने 20 जणांना पकडले. त्यानंतर त्यांना बांधून मराहाण करण्यात आली, तसेच 'गो माता की जय' अशा घोषणाही द्यायला लावल्या. इतक्यावरच न थांबता त्यांची धिंड काडूत पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले. सध्या पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे.


हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांना सूचना मिळाली होती की, खालवा गावाजवळ एक टोळी गाईंची चोरी करून महाराष्ट्रात घेऊन जात आहे. यानंतर कार्यकरत्यांनी शनिवारी रात्री खालवा जवळील महाराष्ट्राच्या सीमेवर गेले. त्यानंत आज(रविवार)सकाळी 5 वाजता त्यांनी गाईंनी भरलेल्या 8 पीकएप व्हॅन पकडल्या.
रस्सी से बांधकर पीटा

 

या गांड्यांमध्ये 22 गाई होत्या, ज्यांना 20 आरोपी महाराष्ट्रात घेऊन येत होते. ग्रामस्थांनी आणि हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पकडून दोरीने बांधले, त्यानंतर त्यांना मारहाण करून गो माता की जय अशा घोषणा द्यायला लावल्या.