अयोध्या प्रकरण / हिंदू पक्षकारांनी साडेसात लाख, मुस्लिम पक्षकारांनी काढल्या ५ लाख फोटोकॉपी

 प्रत्येक फाइलचे करावे लागतील ३५ सेट

दिव्य मराठी

Oct 13,2019 08:51:00 AM IST

प्रमोदकुमार त्रिवेदी

नवी दिल्ली - अयोध्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयात दाखल करावयाच्या कागदपत्रांची संख्या किती मोठी होती याचा अंदाज हिंदू आणि मुस्लिम पक्षकारांनी काढलेल्या एकूण ११ लाख झेरॉक्सवरून येतो. या सुनावणीत हिंदू पक्षकारांनी साडेसात लाख, तर मुस्लिम पक्षकारांनी ५ लाख झेरॉक्स काढल्या आहेत. या दस्तऐवजांची संख्या पाहता कागद आणि वृक्ष वाचवण्यासाठी दस्तऐवजांतील फाँट (अक्षर) लहान असावे आणि ओळींतील अंतर कमी ठेवावे, असे आवाहन मुस्लिम पक्षकारांचे वकील राजीव धवन यांनी केले आहे. याशिवाय, हे दस्तऐवज ए-४ आकारात दाखल केले जावेत, असे त्यांनी म्हटले आहे.

X
COMMENT