आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संध्याकाळी पूजा करण्याचे आहेत वेगळे नियम, याकडे करू नका दुर्लक्ष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवतांची पूजा, उपासना करण्यासाठी वेळेचे कोणतेही बंधन नाही. तुम्हाला वाटेल तेव्हा दिवस, रात्र, सकाळ, संध्याकाळी पूजा करू शकता. केवळ हनुमानाच्या पूजेसाठी एक नियम आहे. तो असा की, अर्धा प्रहर म्हणजे 12 ते 1 या काळात यांची पूजा करू नये. कारण या वेळी हनुमान लंकेत असतात. इतर देवतांसाठी असा कोणताही नियम नाही यामुळे देवतांची पूजा दिवसा आणि रात्रीसुद्धा केली जाते. परंतु रात्रीच्या पूजेसाठी काही नियम आहेत.


> भगवान सूर्य दिवसाचे देवता आहेत. यामुळे दिवसा एखादी विशेष पूजा करावयाची असल्यास सूर्यदेवाची पूजासुद्धा आवश्यक आहे. परंतु रात्रीच्या वेळी पूजा करत असाल तर सूर्यदेवाची पूजा करू नये.


> जर तुम्ही रात्री म्हणजे सूर्यास्तानंतर पूजा करत असाल तर शंख वाजवू नये. कारण सूर्यास्तानंतर देवता झोपण्यासाठी निघून जातात. शंख ध्वनीमुळे त्यांची निद्रा बाधित होऊ शकते. प्राचीन मान्यतेनुसार सूर्यास्तानंतर शंख वाजवल्याने फायद्याऐवजी नुकसान होते.


> भगवान विष्णू, श्रीकृष्ण, सत्यनारायण पूजेमध्ये तुळस अत्यावश्यक  आहे. तुळशीच्या पानांशिवाय यांची पूजा पूर्ण मानली जात नाही. यामुळे जर रात्री पूजा करावयाची असल्यास दिवस असतानाच तुळशीचे पान तोडून ठेवावेत. सूर्यास्तानंतर तुळशीचे पान तोडू नये.


> श्रीगणेशाची पूजा करताना दुर्वा अर्पण करणे आवश्यक आहे. भगवान शिव, सरस्वती, लक्ष्मी आणि इतर देवतांनासुद्धा दुर्वा अर्पण केल्या जातात. यामुळे रात्रीच्या वेळी पूजा करावयाची असल्यास दिवस असतानाच दुर्वा तोडून आणाव्यात.


> रात्रीच्या पूजेमध्ये अर्पण केलेले फुल, अक्षता आणि इतर सामग्री रात्रभर तशीच ठेवावी. दुसऱ्या दिवशी सकाळी या गोष्टी देवघरातून काढून नदीमध्ये प्रवाहित कराव्यात.

बातम्या आणखी आहेत...