आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Hindu, Sikh, Jain, Buddhist And Christian Refugees Get Indian Citizenship, Says Home Minister Amit Shah

हिंदू, शिख, जैन, बौद्ध आणि ख्रिश्चन निर्वासितांना भारतीय नागरिकत्व मिळणार- गृहमंत्री अमित शाह

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता- गृह मंत्री बनल्यानंतर भाजपाध्यक्ष अमित शाह मंगळवारी पहिल्यांदा पश्चिम बंगालमध्ये गेले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, "मी आज हिंदू, शिख, जैन, बौद्ध आणि ख्रिश्चन निर्वासितांना सांगू इच्छितो की, केंद्र सरकार तुम्हाला भारत सोडण्यसाठी बळजबरी करणार नाही. अफवावर लक्ष्य देऊ नका. एनआरसीच्या आधी आम्ही सिटीजनशिप अमेंडमेंट बिल आनणार आहोत, ज्यामुळे निर्वासितांना भारतीय नागरिकत्व मिळण्याचे निश्चित होईल."पुढे ते म्हणाले की, "पश्चिम बंगाल आणि कलम 370 मध्ये एक स्पेशल कनेक्शन आहे, कारण हे याच मातिचे पुत्र आहेत. श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी एक घोषणा केली होती, "एक निशान, एक विधान और एक प्रधान।". त्याआधी शाह कोलकाताच्या नेताजी इंडोर स्टेडियमला पोहचले. भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, तृणमूलने ठरवून एनआरसीबद्दल राज्यात चुकीचा संदेश पसरवण्याचे काम केले आहे. राज्यात आपले नागरिकत्व गमवण्याच्या भीतीने राज्यातील 11 जणांनी आत्महत्या केली होती. शहर आणि राज्यभरातील सरकारी कार्यालयात शेकडोजण आपले जन्म प्रमाणपत्र आणि आवक्षक घेण्यासाठी लाइनमध्ये लागल्याचे पाहायला मिळत आहे.एनआरसी लागू झालेले असाम पहिले राज्य
असाम देशातील पहिले राज्य आहे, जिथे एनआरसी लागू करण्यात आली आहे. तिथे 31 ऑगस्टला एनआरसी लिस्ट जारी केली, ज्यात 19 लाख नागरिकांचे नाव नव्हते. यातील 12 लाख हिंदू आहेत.

बातम्या आणखी आहेत...