आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंदूंमध्ये सर्वात जास्त प्रतिभावान लोक, पण एकत्र येत नाहीत : सरसंघचालक भागवत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिकगो - मानवी कल्याणासाठी हिंदूंनी एकजूट होणे गरजेचे आहे. मात्र, हा समुदाय कधीही एकत्र येत नाही. त्यांनी एकत्र येणे ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. या समुदायात प्रतिभावान सर्वाधिक आहेत, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. दुसऱ्या जागतिक हिंदू परिषदेत शनिवारी ते बोलत होते.

 

जागतिक हिंदू परिषदेत त्यांनी शनिवारी मार्गदर्शन केले. एकसंध समाज म्हणून आपण एकजुटीने काम करू तेव्हाच समृद्ध समाज अस्तित्वात येऊ शकतो. काही संघटना किंवा काही पक्षांनी काम करून चालणार नाही, असे भागवत यांनी सांगितले. सिंह एकटा असतो तेव्हा जंगली श्वानही त्याची शिकार करतात. त्याचे लचके तोडू शकतात. ही गोष्ट विसरता कामा नये. आपल्याला हे जग अधिक चांगले घडवायचे आहे. हिंदूंची प्रतारणा होत आहे. कारण मूलभूत सिद्धांतांचे पालन करणे आणि आध्यात्मिकता यांचा सर्वांनाच विसर पडला आहे. हिंदू समाजाने एकजुटीने विचार करून जगाच्या कल्याणासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी जगाला एका टीममध्ये परिवर्तित केले पाहिजे. आपल्या जगावर साम्राज्य गाजवायचे आहे, ही महत्त्वाकांक्षा मुळीच नाही. हे जग सुंदर व्हावे एवढेच वाटते, असे भागवत यांनी या व्यासपीठावरून सांगितले.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिआे संदेशाद्वारे आपले विचार मांडले. ते म्हणाले, हिंदू तत्त्वज्ञानात अनेक समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता आहे. त्यातून जागतिक समस्यांची सोडवणूक शक्य आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने जास्तीत जास्त लोकांना तत्त्वज्ञानाशी जोडायला हवे, असे आवाहन मोदी यांनी केले. तरूण या विचारांशी चांगल्या प्रकारे जोडले जाऊ शकतात.

 

बातम्या आणखी आहेत...