आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंदुत्व पुरेसे नाही, नवा फाॅर्म्युला माेदींनी शाेधावा!

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

राजदीप सरदेसाई   अयाेध्याप्रकरणी सर्वाेच्च न्यायालयाकडून निकाल आल्यानंतर काही दिवसांतच शिवसेनेने भाजपशी युती ताेडली. रामजन्मभूमी आंदाेलनाच्या काळात अस्तित्वात आलेली ही युती खऱ्या अर्थाने हिंदुत्वाची युती ठरली हाेती. अर्थात, यामध्ये दाेघांचे हित हाेते. रथयात्रेच्या लाटेवर स्वार हाेत १९८४ च्या पराभवाच्या धक्क्यातून भाजप सावरला आणि दिल्लीच्या तख्तापर्यंत पाेहाेचला. अयाेध्या प्रकरणानंतर मुुंबईत १९९२-९३ मध्ये उसळलेल्या दंगलीच्या काळात हिंदूंची रक्षक म्हणून शिवसेना नावारूपाला आली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी जाहीरपणे ‘बाबरी मशिदीचे पतन शिवसैनिकांनी केल्याचा मला गर्व आहे,’ असे सांगितले हाेते. आता या युतीचा काडीमाेड झाला आहे. याचा अर्थ आक्रमक हिंदुत्वाचे राजकारण लयास चालले आहे की संधिसाधूपणा हाच राजकारणातील सर्वाधिक सफल ‘वाद’ आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न सुरू आहे. गेल्या सहा महिन्यांपूर्वी भाजपने सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान माेदींचे व्यक्तित्व आणि त्यांचा राष्ट्रवाद, बहुसंख्याकवाद आणि कल्याणवादाच्या त्रिशुळावर स्वार हाेत माेठा जनाधार मिळवला. महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीने लाेकसभेच्या ४८ पैकी ४१ जागा पटकावल्या आणि विधानसभेच्या २३० जागांवर आघाडी कायम राखली. राष्ट्रीय अजेंड्यापेक्षाही स्थानिक मुद्दे अधिक प्रभावी ठरल्यामुळे युतीला विधानसभा निवडणुकीत लाेकसभेची पुनरावृत्ती करता आली नाही.  उदाहरणार्थ, अयाेध्येतील मंदिर-मशीद वादाने भाजपच्या मतदारांना प्रेरित केले, परंतु त्याचे पडसाद सामाजिक आणि प्रादेशिक स्तरावर मर्यादित आणि कालसुसंगत असेच राहिले. प्रारंभी या मुद्द्याने भाजपला २० टक्क्यांपेक्षाही अधिकचा पक्ष बनवला, परंतु गेल्या ५ वर्षांतच परिणामकारक पक्षाच्या रूपात त्यास स्थान मिळाले. २००९ च्या निवडणुकीत भाजपला १८% मते मिळाली हाेती, १० वर्षांत ही संख्या ३७% वर पाेहाेचली. काँग्रेसचा पराभव आणि माेदींना नंबर १ चा नेता म्हणून मिळत राहिलेली पसंती हेच मुख्य कारण हाेते. भाजपच्या मतांमध्ये राममंदिर किंवा ३७० वे कलम, समान नागरी कायदा यामुळे वाढ झाली नाही, तर राष्ट्रीय पर्यायांकडून हाेणारी निराशा आणि माेदींच्या नेतृत्वामुळे लाेकांच्या वाढत्या आशा हे त्यामागचे इंगित आहे. माेदी युगात भाजपने विकास आणि हिंदुत्वाच्या रथातून स्वारी करण्याचा प्रयत्न केला. ज्या वादग्रस्त मुद्द्यांवर सहमती घडवण्याचा प्रयत्न अटलबिहारी वाजपेयी यांनी केला तसा काही दबाव माेदी-अमित शहा यांना जाणवत नाही. माेदी-२ पर्वाच्या पहिल्या ६ महिन्यांत सरकारने ३७० वे कलम हटवले, राममंदिर उभारणीसाठी न्यायालयाने परवानगी दिली, तीन तलाकची प्रथा फाैजदारी गुन्हा ठरवला आणि समान नागरी कायद्याच्या दिशेने एक पाऊल टाकले. भगवे वस्त्र धारण करणाऱ्या विभूतीला उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री बनवून भारताची मूळ हिंदू राष्ट्राची आेळख प्रभावीपणे प्रत्येक पातळीवर मुख्य प्रवाहात आणण्याचा स्पष्ट संदेश माेदी-शहा यांनी दिला आहे. राष्ट्रवादाचा रथ तर चाैखूर उधळत आहेे, परंतु विकास रथाची गती मंदावल्याने ताे अडखळू लागला आहे. काही महिन्यांपूर्वी पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे दाखवलेले स्वप्न काेलमडणारी वृद्धी, वाढती बेराेजगारी, तणावपूर्ण बँकिंग व्यवस्था आणि गुंतवणूकदारांमधील वाढता संभ्रम, आत्मविश्वासाचा अभाव या दुष्टचक्रात फसलेले दिसते. वास्तविक समस्यांचा स्वीकार करण्याएेवजी राजकीय अजेंड्याप्रमाणेच माेदी सरकारने अर्थव्यवस्थेचा विचार सुरू केला, म्हणजेच वित्तीय संस्थांची उपेक्षा चालवली. याचाच एक नमुना म्हणजे ग्रामीण भागातील क्रयशक्ती कमी हाेत असल्याचे आकडे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने समाेर आणले तेव्हा हा सारा डाटा बासनात टाकण्यात आला. अर्थव्यवस्थेचा गाडा रुळावर आणण्याचे प्रयत्न करण्याएेवजी सतत राजकीय अजेंड्याप्रमाणे त्याचा विचार करणे माेदी सरकारला भाग पडते त्याचे मूळ कारण हेच आहे. राजकारणात चतुर हेडलाइन मॅनेजमेंटला संधी मिळते, ती लाेकांना भावनात्मकदृष्ट्या व्यग्र ठेवते. कलम ३७०, अयाेध्या प्रकरणामुळे ध्रुवीकरण हाेत असले तरी ते भाजपची मते प्रभावित करीत आहेत हे लक्षात घेतले पाहिजे. येत्या रामनवमीच्या आसपास अयाेध्येतील श्रीराम मंदिराची काेनशिला उभारण्याची याेजना आहे. त्यानंतर मंदिर उभारणीतील लाेकसहभाग अधिकाधिक वाढवण्यासाठी अनेक कार्यक्रम हाेतील, ते २०२२ मधील उत्तर प्रदेश निवडणुकीपर्यंत चालतील. धार्मिक राष्ट्रवादाच्या राजकारणाला काही मर्यादा आहेत.  काश्मिरातील अलीकडच्या घटनाक्रमामुळे माेदी सरकारच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेला तडा गेला आहे. शिवसेनेचे बंड संधिसाधूपणाचे लक्षण ठरू शकते, परंतु सर्वांना साेबत ठेवण्यासाठी केवळ हिंदुत्व पुरेसे ठरत नाही. म्हणूनच आर्थिक संकटावर मात करण्यासाठी, मतदारांना भाजपसाेबत जाेडून ठेवण्यासाठी माेदी सरकारने नव्या फाॅर्म्युल्याचा विचार केला पाहिजे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शिवसेना खासदार ‘पहले किसान, फिर भगवान राम’ अशी घाेषणाबाजी करीत हाेते. याचा अर्थ वर्तमानातील संदर्भ बदलले आहेत.

बातम्या आणखी आहेत...