आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘फुलराणी’ची झुंज सुरूच! प्रकृती अजूनही नाजूक

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

नागपूर - बॉटनीची प्राध्यापिका असणाऱ्या आणि पानाफुलांत रमणाऱ्या हिंगणघाटच्या फुलराणीची झुंज अजूनही सुरूच आहे. मेडिकल बुलेटिनमध्ये गुरुवारी ही माहिती देण्यात आली. वैद्यकीय अधीक्षक डाॅ. नुरुल अमीन यांच्या नेतृत्वाखाली डाॅक्टरांचे एक पथक सातत्याने तिच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तसेच राज्यमंत्री बच्चू कडू व महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी आॅरेंजसिटी रुग्णालयाला भेट देऊन फुलराणीच्या प्रकृतीची विचारपूस केली. सोमवारी विकी नगराळे या नराधमाने या फुलराणीवर पेट्राेल टाकून पेटवून दिले होते. यात तिची श्वसननलिका व फुप्फुसांना गंभीर दुखापत झाली आहे. जखम किती खोलवर आहे याबाबत अद्याप काही सांगू शकत नसल्याचे डाॅक्टरांचे म्हणणे आहे. तरुणीचा चेहरा, गळा, डोके, डावा हात आणि छातीवर अधिक जखमा असून डाेळ्यावरही भाजल्याच्या जखमा आहेत. 

तातडीने फाशीची शिक्षा द्या : जन आक्रोश मोर्चात मागणी

वर्धा - निष्पाप फुलराणीला पेटवून देणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करत शहरातील शिवाजी महाराज चौक येथून गुरुवारी सकाळी जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारोंच्या संख्येने महिला सहभागी झाल्या. बाजारपेठही बंद होती. पीडित फुलराणीचा भाऊ, कुटुंब मोर्चात सहभागी होते.

बातम्या आणखी आहेत...