आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नका; तरुणीची प्रकृती अजुनही चिंताजनक, उपचार सुरूच

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्य सरकारने पीडितेच्या उपचारासाठी 4 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे

नागपूj- हिंगणघाट येथील जळीत प्रकरणातील युवतीची प्रकृती चिंताजनक असून स्थिर आहे. तिच्यावर उपचार सुरू असलेल्या ऑरेंज सिटी रुग्णालयाच्या वतीने बुधवारी सकाळी ही माहिती देण्यात आली. पीडित युतीवर रुग्णालयात प्लास्टिक सर्जन डॉ. दर्शन रेवनवार, क्रिटिकल केअर तज्ञ डॉ. राजेश अटल, ईएनटी तज्ञ डॉ. सिद्धार्थ सावजी, नेत्ररोग तज्ञ डॉ. अभय आगाशे या डॉक्टरांच्या नेतृत्वात उपचार सुरू आहेत. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासमवेत मुंबईच्या नॅशनल बर्न इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. सुनील केशवानी यांनीही नागपुरात येऊन पीडितेच्या प्रकृतीची पाहणी केली.

सोशल मीडियावर अफवा
पीडितेवर उपचार सुरू असतानाही समाजमाध्यमांवर तिच्या प्रकृतीविषयी विविध प्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहेत. परंतु, डॉक्टरांनी त्या स्पष्टपणे फेटाळून लावल्या आहेत. पीडितेच्या प्रकृती संदर्भात व्हॉट्सअॅप आणि इतर सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या बातम्या खोट्या आहेत. तिच्यावर अजुनही उपचार सुरू आहेत.


रुग्णालयात तिच्या उपचारासाठी उत्तम व्यवस्था असल्याने पीडितेला उपचारासाठी मुंबईला हलविण्याची गरज नाही, असा निर्वाळा डॉ. केशरवानी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला. दरम्यान, पीडितेच्या उपचारासाठी राज्य सरकारने तातडीची उपाययोजना म्हणून 4 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी तातडीने रुग्णालयाला देण्यात यावा, असे निर्देश वर्धा जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. याशिवाय पीडितेच्या आई-वडिलांनाही आवश्य आवश्यक ती मदत देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.