आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हैदराबादच्या मिरची व्यापाऱ्याला 18 लाखांचा 'तडका', खाजगी बसमधून चोरट्यांनी पळवली बॅग

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हिंगोली ते वाशीम मार्गावरील घटना, चोरीचे कनेक्शन अकोल्यात

मंगेश शेवाळकर

हिंगोली- अकोला येथील मिरची विक्रीचे पैसे वसुलीकरून परतणाऱ्या हैरदराबादच्या व्यापाऱ्याला 18 लाखांचा 'तडका' बसला आहे. हिंगोली ते कनेरगाव नाका मार्गावर खाजगी बस ढाब्यावर थांबली असतांना चोरट्यांनी 18 लाखांची बॅग पळवली. या प्रकरणी रविवार (ता.8) हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आता अकोला भागात पथके रवाना केली आहेत.


हैदराबाद येथील मिरची व्यापारी जी. श्रीनिवासराव हे अकोला येथील व्यापाऱ्यांना मिरची विक्री करतात. त्यानंतर मिरची विक्रीचे पैसे वसुलीसाठी जातात. नेहमी प्रमाणे श्रीनवासराव हे शनिवारी (ता. 7) पैसे वसुलीसाठी हैदराबाद येथून अकोला येथे गेले होते. त्या ठिकाणी दोन व्यापाऱ्यांकडून एकूण आठरा लाख रुपयांची वसुली केली. यामध्ये एका मिरची व्यापाऱ्याकडून 7 लाख तर अन्य एका कडून 11 लाख रुपये वसुल केले. ही रक्कम एका बॅगमधेे ठेऊन ते खाजगी बसने अकोला येथून नांदेडकडे निघाले होते.


बसमधे 23 क्रमांकाच्या सीटवर ते बॅग उशाखाली घेऊन झोपले. कनेरगाव नाका ते हिंगोली मार्गावर एका ढाब्यावर रात्रीच्या वेळी बस जेवणासाठी थांबली होती. काही प्रवाशांनी खाली उतरून जेवण केले. मात्र काही वेळातच श्रीनिवासराव यांना जाग आली मात्र त्यांच्या उशीखाली असलेली बॅग पळविल्याचे लक्षात येताच त्यांना घामच फुटला. त्यांनी हा प्रकार चालक व क्लिनर यांना सांगितला. त्यानंतर बस थेट हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात आणण्यात आली. या प्रकरणी श्रीनिवासराव यांच्यातक्रारीवरून हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.


दरम्यान, हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक अंगद सुडके, उपनिरीक्षक राहुल तायडे, गुन्हे शाखेचे निरीक्षक जगदिश भंडारवार, उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, किशोर पोटे, जमादार सुनील अंभोरे, संभाजी लेकुळे, बालाजी बोके, आशिष उंबरकर यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली आहे. या ढाब्यावर काही जणांची चौकशीही पोलिसांनी केली आहे.

चोरीचे कनेक्शन अकोला येथेच


व्यापारी पैसे वसुलीसाठी गेल्यानंतर चोरट्यांनी त्याच्यांवर लक्ष ठेवले असावे, बस थांबल्याची संधी साधून चोरट्यांनी बॅग पळविल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या चोरीचे कनेक्शन अकोला येथेच अशल्याचा दाट संशय पोलिसांनी असून पोलिसांचे पथक अकोला भागात रवाना करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...