आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐनवेळी लग्नास नकार देणाऱ्या नवरदेवासह अन्य दोघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल, सुकळी येथील घटना

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • ऐनवेळी मुलगी पसंत नसल्याचं फोनवर सांगितलं

हिंगोली- विवाह सोहळ्यासाठी नवरदेवास आणण्यासाठी येत आहोत असा दुरध्वनी केल्यानंतर पलिकडून मुलगी पसंत नाही येऊ नका असा निरोप मिळताच मुलीच्या वडिलांच्या पायाखालची वाळूच सरकली. ऐनवेळी लग्नास नकार देऊन फसवणुक केल्याची तक्रार दिल्यानंतर या प्रकरणात नवरदेवासह अन्य दोघांवर कुरुंदा पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. 3 मार्च) रात्री उशीरा अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील सुकळी येथील एका तरुणीचा ढोलक्याचीवाडी (ता.कळमनुरी) येथील संदीप पाचपुते या तरुणाशी विवाह ठरला होता. त्यानुसार लग्नपत्रिका काढल्या होत्या. विवाहाची तारीख ठरविण्यात आली होती. मंगळवारी विवाह मुहुर्त ठरविण्यात आला होता. लग्न पत्रिकादेखील वाटप करण्यात आल्या होत्या.


मुलीच्या घरच्या मंडळीकडे लग्नाची जोरदार तयारी झाली होती. त्यानंतर सोमवारी मुलीच्या घरच्या मंडळींनी नवरदेवास घेण्यासाठी येत आहोत त्यांना तयार ठेवा असा दुरध्वनीवरून निरोप दिला. मात्र आम्हाला मुलगी पसंत नाही, आम्ही लग्नासाठी तयार नाही असा निरोप नवरदेवाकडील मंडळींनी दिला.


या निरोपामुळे मात्र मुलीच्या घरच्या मंडळींच्या पायखालची वाळूच सरकली. ऐनवेळी नवरदेव लग्नास तयार नाही असा निरोपदेखील कुुटुंबियांना सांगणे कठीण झाले होते. आता पाहूणे मंडळींना काय सांगावे असा प्रश्‍नही मुलीकडील मंडळींसमोर उभा राहिला. मात्र लग्नाच्या वेळेपर्यंत आपण समजावून सांगू या आशेवर मुलीच्या घरच्या मंडळींनी नवरदेवाकडे जाऊन विनावणी करण्यास सुरवात केली. मात्र त्याच्याकडील मंडळी ऐकण्यास तयार नव्हती.


अखेर लग्नाचा मुहुर्त टळल्यानंतर मुलीच्या वडिलांनी थेट कुरुंदा पोलिस ठाणे गाठले. यामध्ये नवरदेवासह त्याच्या कुटुंबियांनी मुलीचे लग्न न करताच कन्यादान म्हणून 1 लाख 75 हजार रुपये, एक पाच ग्रामची सोन्याची अंगठी व कपडे घेऊन फसवणुक केल्याचे तक्रारीत नमुद केले आहे. यावरून कुरुंदा पोलिसांनी नवरदेव संदीप पाचपुते याच्यासह अन्य दोघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील गोपीनवार, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बी. टी. केंद्रे पुढील तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...