आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
हिंगोली - सेनगाव तालुक्यातील भगवती येथे शेतात तुरीच्या पिकाची मळणी करताना यंत्रात अडकलेल्या तरुणाचा अवघ्या काही सेकंदात चक्काचूर झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी ता.७ दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी गोरेगाव पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
सेनगाव तालुक्यातील भगवती येथील राजू दिगंबर जाधव (३५) हे गावातील सुरेश जाधव यांच्या ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करतात. शुक्रवारी सकाळी गावातील महादेव जाधव यांच्या शेतात ट्रॅक्टरवर चालणारे मळणी यंत्र घेऊन ते गेले होेते. मळणी यंत्रात तुरीच्या पेंड्या टाकण्याचे काम राजू करीत होते. दुपारी अडीचच्या सुमारास अचानक त्यांचा हात मळणी यंत्रात अडकला. त्यामुळे ते यंत्रात ओढले गेले अन् अवघ्या काही सेकंदात त्यांच्या डोक्याचा चक्काचूर झाला. हा प्रकार तेथील मजुरांना लक्षात आला. मात्र ट्रॅक्टरवर चालणारे मळणी यंत्र त्यांना लवकर बंदही करता आले नाही. तोपर्यंत राजू जाधव यांच्या कंबरेपर्यंतचा भाग मळणी यंत्रात अडकून शरीराच्या चिंधड्या झाल्या. गोरेगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीमनवार यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. या प्रकरणी रात्री उशीरा गोरेगाव पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
मयत राजू जाधव हा कुटुंब प्रमुख होता. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.