आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा परीक्षेत अपयश आल्याने हिंगोलीत तरुणाची आत्महत्या

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली - हिंगाेली जिल्ह्यात मागील काही दिवसापासून आत्महत्यांचे जणू सत्रच सुरू आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास एका जवानाच्या पत्नीने अात्महत्या केली. त्याच्या दुसऱ्या दिवशी एका उच्चशिक्षित तरुणाने स्पर्धा परीक्षांमध्ये सतत अपयश येत असल्यामुळे गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. दिलीप बळीराम हरणे (२६, रा. सावरखेडा ह. मु. सुराणा नगर, हिंगोली) असे मृत तरुणाचे नाव आहे. दिलीप हा मागील दोन-तीन वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. त्यात त्याला दोन वेळा अपयश आले. त्यामुळे तो नेहमीच मानसिक तणावाखाली राहात होता. अशा परिस्थितीतही त्याने नांदेड जिल्ह्यात स्पर्धा परीक्षेचे शिकवणी वर्गही लावले होते. मात्र अपयश येत असल्यामुळे तो नेहमीच तणावग्रस्त अवस्थेत राहात होता. नातेवाइक त्याला  चिंता करू नको एक ना एक दिवस यशस्वी होशील, असा सल्ला देत होते. परंतु ताे मानसिक तणावाखालीच राहत होता. त्यामुळे त्याने सुराणा नगर भागातील आपल्या राहत्या घरात आज सकाळी ९ वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी ग्रामीण पोलिसांनी धाव घेतली.  पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवला. याबाबत हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.