आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेटच्या बॅट, चेंडू व खेळपट्टीचा इतिहास : १७ व्या शतकात हाॅकी स्टिकच्या आकाराची बॅट; तर कपड्यांपासून बनवला होता चेंडू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिव्य मराठी न्यूज नेटवर्क  - येत्या ३० मेपासून इंग्लंडमध्ये आयसीसीच्या वनडे वर्ल्डकपला सुरुवात हाेत आहे. या वर्ल्डकपची फायनल १४ जुलै राेजी रंगणार आहे. क्रिकेटच्या विश्वातील या सर्वात माेठ्या स्पर्धेचे इंग्लंडमध्ये यंदा आयाेजन करण्यात आले. कारण, याच ठिकाणी या खेळाचा जन्म झाला. क्रिकेटच्या सुरुवातीबाबतची स्पष्ट अशी अधिक माहिती उपलब्ध नाही.  मात्र, १५९८ मध्ये इटलीच्या जाॅन फ्लाेरियाे यांच्या “ए वर्ल्ड ऑफ वर्ड‌्स’ या  डिक्शनरीमध्ये  पहिल्यांदा क्रिकेट ए विकेट अशा शब्दाचा  वापर करण्यात आलेला असल्याचे दिसून आलेले आहे. 


बॅट : विषयी कुणालाही स्पष्ट अशी माहिती नाही.
 

> 1720 मध्ये काठीचा क्रिकेटसाठी वापर :  
क्रिकेटमध्ये बॅटचा वापर १६२० मध्ये करण्यात आल्याची माहिती आहे. फलंदाजाने फील्डरकडून झेल राेखण्यासाठी याचा वापर केल्याचे आढळून आले. मात्र, यादरम्यानच्या बॅटचा आकार कसा हाेता, याबाबतीत अधिक स्पष्ट अशी माहिती उपलब्ध नाही. बकऱ्यांना हाकलण्यासाठीच्या काडीचा वापरही बॅट म्हणून करण्यात आला. तसेच हाॅकी स्टिकच्या काडीचाही वापर झालेला आहे. 


> 1750 मध्ये बॅटच्या स्वरूपात थाेडा बदल झाला.  त्यामुळे याचे स्वरूप हे हाॅकी स्टिक आणि त्यादरम्यानच्या काठीसारखेही नसल्याचे दिसून आलेे. 


> 1800-1840 दरम्यान बॅटच्या स्वरूपात सर्वात माेठा बदल झाला. खालील भाग हा फ्लॅट हाेऊ लागला. यासाठी अखंड लाकडाचा वापर हाेऊ लागला. 


> 1774-1790 दरम्यानच्या काळात बॅटचा आकार हा आताच्या स्वरूपाशी बराचसा मिळताजुळता आहे.  त्याच्या हँडलपासून खालच्या भागाचे स्वरूपही सारखे आहे.


> 1800-1840 दरम्यान बॅटच्या स्वरूपात सर्वात माेठा बदल झाला. खालील भाग हा फ्लॅट हाेऊ लागला. यासाठी अखंड लाकडाचा वापर हाेऊ लागला. 


> 1900 पासून आतापर्यंत आेव्हरआॅर्म बाॅलिंग सुरू झाल्याने मजबूत व टणक अशी बॅट तयार करण्यात आली.  त्यामुळे भरधाव वेगाचा 

 

> बॅट निर्मितीचा नियम :  क्रिकेटचे नियम तयार करणाऱ्या एमसीसीने बॅट तयार करण्यासाठी काही नियम केले. त्यानुसार बॅटची लांबी ९६.५ सेंमीपेक्षा अधिक नसावी. तसेच रुंदी १०.८ संेमीपेक्षा अधिक नसावी.  बॅटच्या वजनाबाबताच काेणताही नियम नाही. 

 

चेंडू: विषयी काेणाकडेही स्पष्ट अशी माहिती उपलब्ध नाही.

चेंडूंचा इतिहास
सुुरुवातीला लाेकर किंवा कापडाच्या वापरातून चेंडू तयार केला जात असे. १७४४ मध्ये क्रिकेटचे नियम तयार झाले. यादरम्यान प्रथमच लेदरचा चेंडू वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, यादरम्यान चेंडूचा आकार स्पष्ट नव्हता. 


> १९७७ पर्यंत लाल रंगाच्या चेंडूचा हाेत असे वापर
सुुरुवातीला लाल रंगाच्या चेंडूवर क्रिकेट खेळले जात असे. काॅर्कपासून याची निर्मिती केली जात असे. तेव्हापासून आतापर्यंत फक्त चेंडूच्या रंगातच बदल करण्यात आला. १९७७ पर्यंत याच चेंडूचा वापर केला जात असे. नवीन चेंडू हा सर्वात स्विंग असे. मात्र, जुना झाल्यावर  ताे रिव्हर्स स्विंग हाेत असे.  आता लाल रंगाचा चेंडू कसाेटीत वापरला जाताे. 


पहिल्यांदा कॅरी पॅकर मालिकेत पांढऱ्या रंगाचा चेंडू 
ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदा पांढऱ्या रंगाच्या चेंडूचा वापर करण्यात आला. १९७७ मध्ये कॅरी पॅकर वर्ल्ड सिरीज याच चेंडूवर खेळवण्यात आली. या मालिकेनंतर वनडेत पांढऱ्या रंगाचा चेंडू व रंगीत कपड्यांच्या वापरास सुरुवात झाली. आताही पांढऱ्या रंगाच्या चेंडूचा मर्यादित षटकांच्या सामन्यासाठी वापर केला जाताे. 

 

> चेंडूच्या वजनाचा नियम : वजन १६३ ग्रॅमपेक्षा अधिक नसावे. गोलाकार २२.९ सँमीपेक्षा अधिक असू नये. त्यामुळे याच नियमानुसार चेंडूच्या निर्मितीचा निर्णय घेण्यात आला. यात अद्याक काेणत्याही बदल झालेला नाही. 

 

> खेळपट्टीच्या लांबीत फक्त एका यार्डचे अंतर : पिचच्या लांबीमध्ये सुरुवातीच्या तुलनेत आता फक्त एका यार्डच्या अंतराचा समावेश झाला. १७४४ पूर्वी पिच २३ यार्डची हाेती. त्यानंतर  आता २२ यार्डची तयार करण्यात येऊ लागली. 
 

बातम्या आणखी आहेत...