आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुटपाथवर झोपलेल्या मजुरांना चिरडून 70 फुट उंच ब्रिजवरून कोसळली कार; 5 ठार, 6 जण जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिसार - हरियाणाच्या दिल्ली रोड येथील जिंदाल पुलावर रात्री उशीरा हृदयद्रावक अपघात घडला आहे. येथील ब्रिजच्या फुटपाथवर झोपलेल्या मजुरांना एका भरधाव कारने चिरडले आणि 70 फुट उंचीवर कोसळली. या भीषण अपघातात 5 मजुरांचा मृत्यू झाला असून इतर 6 जण जखमी आहेत. मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये तीन जण बिहार आणि उर्वरीत दोघे सहरसा येथील रहिवासी होती. पुलावर गेल्या दोन दिवसांपासून रस्त्याचे काम सुरू होते. सर्वच मजूर आपले दिवसभराचे काम आटोपून झोपले होते. मात्र, मंगळवारी आणि बुधवारच्या रात्री 2 वाजता भरधाव कार त्यांना चिरडून गेली. फुटपाथवर ठेवलेल्या ड्रमवर आदळल्यानंतर आणखी एक कारचे नुकसान झाले असून त्यामध्ये प्रवास करणारे लोक जखमी आहेत. 

 

रस्ता बंद असतानाही घुसली कार...
जिंदाल पुलावर डांबरीकरण सुरू असल्याने कोलतार रस्ता बंद ठेवण्यात आला होता. मजुरांनी रस्ता बंद करण्याची कुंपणे सुद्धा लावली होती. तरीही रात्री उशीरा या रस्त्यावर एक भरधाव कार घुसली. स्पीड जास्त असल्याने आणि रस्ता खोदून ठेवण्यात आल्याने त्यांचे नियंत्रण सुटले. अशात ड्रायव्हरने फुटपाथवरून मार्ग करताना निघण्याचा प्रयत्न केला आणि त्याच फुटपाथवर झोपलेले मजूर चिरडले गेले. अपघातात जखमी झालेल्या एका मजुरीने सांगितल्याप्रमाणे, 15 मजूर दिवसभराचे काम आटोपून रात्री 10 च्या सुमारास पुलावरील ब्रिजवरच झोपले होते. रात्री 2 वाजेच्या सुमारास सहकारी मजुरांच्या किंचाळण्याने त्याची झोप उडाली. दुसऱ्याच सेकंदाला ब्रिजवरून काही कोसळल्याचा आवाज आला. समोर पाहिले तेव्हा रक्तात माखलेले मृतदेह आणि जखमी मजूर दिसत होते. 

 

बातम्या आणखी आहेत...