आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WorldCup/ हिटमॅन रोहित शर्माच्या सिक्सरने प्रेक्षकातील एक महिला झाली जखमी, याप्रकारे रोहितने जिंकली चाहत्यांची मने

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- आयसीसी विश्व चषक 2019 मध्ये भारताचा हिटमॅन म्हणून ओळखला जाणाऱ्या रोहित शर्माने विश्वचषकातील आणखीन एक शतक मारले आहे. त्याने 92 चेंडूत 7 चौके आणि 5 छक्क्याच्या मदतीने 104 रन काढले. या शतकानंतर त्याने अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहे. सामना संपल्यानंतर त्याने आपली हॅट आपल्या चाहतीला दिली. ही फॅन साधीसुधी नसून, रोहितच्या 6 छक्क्यांपैकी एक छक्का या चाहतीला लागला होता. त्यानंतर कृतज्ञता दाखवत रोहितने तिला आपली हॅट गिफ्ट केली.


रोहितचा चेंडू लागलेल्या महिलेची नाव मीना आहे. तिला चेंडू लागल्याचा लाइव्ह व्हिडिओ मैदानातील स्क्रीनवर दाखवण्यात आला. सामना संपल्यानतर रोहितने आपल्या ऑटोग्राफवाली पिवळ्या रंगाची टोपी तिला गिफ्ट केली. हे मोठे गिफ्ट मिळताच मीनाचे दुखणे कमी झाली आणि ती खूप आनंदी दिसत होती.


भारताने बांग्लादेशला 28 रनाने पराभूत करून सेमीफायनलमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. टॉस जिंकून फलंदाजी करताना सलामिवीर रोहित शर्माचे शतक (104 रन) आणि केएल राहुलच्या अर्धशतक(77) मदतीने 50 ओवरमध्ये 9 बाद 314 असा विशाल स्कोर भारताने बांग्लादेशला दिला होता. त्याचा पाठलाग करताना 48 व्या ओवरमध्ये 286 रन काढून बांग्लादेशचा संपूर्ण संघ बाद झाला.


 

धोनीला सोडले मागे
रोहित शर्माने सामन्यात 5 छक्के मारून भारताचा सर्वात जास्त छक्के मारणारा फलंदाज ठरला आहे. रोहितने आतापर्यंत 230 छक्के मारले आहेत. त्याने धोनीच्या 228 छक्क्यांच्या रेकॉर्डला मागे टाकले. 


संघकाराची बरोबरी
रोहितचे विश्वचषकातील हे चौथे शतक आहे आणि सलग दुसरे. या शतकासोबत त्याने संघकाराच्या विश्वचषकातील सर्वात जास्त शतक मारण्याच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. 2015 च्या वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेचा माजी फलंदाज कुमार संगकाराने 4 शतक मारले होते.

बातम्या आणखी आहेत...