आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Hittikar Said, "Why Can Not A Hero With A Fair Color Play The Role Of Darker Color Person ?"

ऋतिकने छेडला नवा वाद, म्हणाला - 'फेयर कलर असलेला हीरो सावळ्या रंगाच्या व्यक्तीचा रोल का करू शकत नाही ?'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : ऋतिक रोशनने आपला अशातच रिलीज झालेला चित्रपट 'सुपर 30' मुळे एक नवा वाद छेडला आहे. त्याने त्या निंदकांचा क्लास घेतला आहे, जे त्याच्या रंगाचा मुद्दा घेऊन त्याच्या भूमिकेची निंदा करत आहेत. निंदकाचे म्हणणे आहे की, एवढा गोरा माणूस डार्क कलरवाल्या आनंद कुमार यांची भूमिका साकारताना खूप विचित्र वाटत आहे. यावर ऋतिकने तर्क दिला आहे की, तो पहिला चित्रपट 'कहो ना प्यार है'पासून सलग डार्कर शेड्सवाल्या भूमिका साकारत आहे. 
 

पहिल्या चित्रपटापासून आतापर्यंत साकारल्या जास्तीत जास्त डार्कर कलरच्या भूमिका... 
ऋतिक म्हणाला, 'कहो न प्‍यार है' मधील राजपासून 'सुपर 30' च्या आनंदपर्यंत मी जास्तीत जास्त भूमिका डार्क स्किनवाल्या पात्रांच्याच साकारल्या आहेत. 'धूम 2' चा आर्यनदेखील आनंदपेक्षा जास्त डार्क होता. भले तो स्टाइलिश होता, पण डार्क होता. आनंदची देसी स्टाईल आहे. तो महागडे कपडे आणि बुटांच्या ऐवजी साधे कपडे आणि चप्पल घातलेला दिसत आहे. त्यामुळे लोकांना विचित्र वाटत आहे. तसेच 'अग्नि‍पथ'मधील विजयदेखील आनंदपेक्षा जास्त डार्क होता. 

 

ऋतिक पुढे म्हणाला, 'मला वाटते जे लोक प्रश्न करत आहेत, एक फेयर कलरवाला अभिनेता डार्कर का होत आहे, तर त्यांच्या प्रश्नातच रेसिज्‍म आहे. एका फेयर कलरअभिनेत्याला हक्क अननाही का की, त्याने डार्कर कलरवाल्या भूमिका साकाराव्या.'

 

मानसिक दबावाबद्दलही बोलला... 
अशातच ऋतिकदेखील कौटुंबिक कारणांमुळे खूप कठीण काळातून जात आहे. यादरम्यान तो खूप मानसिक दबावामध्ये राहात आहे. अशा परिस्थितीतून तो कसा बाहेर आला हेही त्याने सांगितले. तो म्हणाला, 'अशा प्रकरणात मी परेशानीचे लॉजिक शोधतो. मी काय करू शकतो ते पहातो. मग मी माझ्या प्राथमिकता ठरवतो. हे क्लियर करतो की, माझे काम काय आहे, माझे कर्तव्य काय असायला हवे ? या सर्वानंतर खराब परिस्थितीचा सामना कसा केला जाऊ शकतो. त्यावर फोकस करून आपले ध्येय सध्या करण्यात वापरतो. ही माझ्यासाठी स्पिरिच्युऍलिटीदेखील आहे.'